Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

इंटरनेटच्या जगात दररोज वेगवेगळे फोटो-व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या अशीच एका एचआर म्हणून काम करणाऱ्या महिलेची लिंक्डइनवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. प्रियवर्षिनी एम असे या महिलेचे नाव असून तिने केलेल्या पोस्टमुळे इंटरनेटवर कामच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी नैतिकता जपण्याविषयी वाद पेटला आहे. या पोस्टमध्ये एका कर्मचाऱ्याने कशी नोकरीत रुजू झाल्यानंतर अवघ्या एक महिन्यात कसा राजीनामा दिला, याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

त्यांच्या पोस्टमध्ये प्रियवर्षिनी यांनी सांगितले की या कर्मचाऱ्याचा पगार हा सकाळी 10.00 वाजता त्याच्या बँक खात्यात जमा झाला आणि त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत राजीनाम्याचा इमेल 10 वाजून 5 मिनिटांनी मिळाला. यानंतर त्यांनी असे करण्यामादील नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत . ”हे योग्य होते का? हे नैतिकदृष्ट्‌‍या योग्य होते का?,” असे त्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

प्रियवर्षिनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये खुलासा केला की कर्मचाऱ्याचा पगार सकाळी 10:00 वाजता जमा झाला, फक्त राजीनामा ईमेल सकाळी 10:05 वाजता आला. त्यांनी अशा निर्णयामागील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले, ”ते योग्य होते का? ते नैतिक होते का?”

या महिलेने काही मुद्दे देखील अधोरेखित केले आहेत. जसे की, जर तुमाचा टिकून राहण्याचा विचार नव्हता, मग नोकरी का घेतली? प्रक्रियेतून का गेलात? ऑनबोर्डिंग किंवा प्रशिक्षण सुरू असताना शांत का बसलात?

या एचआरच्या मते पगार झाल्यानंतर लगेचच राजीनामा देणे हे ”उद्देश, परिपक्वता आणि जबाबदारीचा आभाव दर्शवते”, आणि यामुळे नोकरी देणारी कंपनी आणि सहकाऱ्यांना चुकीचा संदेश जातो.

या पोस्टची ऑनलाईन चांगलीच चर्चा होताना दिसत असून ही व्हायरल झाली आहे. या पोस्टवर 2,000 हून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत तर 600 हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. या पोस्टवरून वाद-विवाद देखील सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. कंपन्या कशा प्रकारे कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढून टाकतात इथपासून ते कंपन्या नैतिकतेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, तर काहींनी कर्मचाऱ्याने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.

व्यक्ती चुकीचा नाही. पण एचआर म्हणून तुम्ही अशा गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत. यामुळे तुमची अपरिपक्वता दिसून येते, अशी कमेंट एका वापरकर्त्याने केली आहे.