नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
राजधानी दिल्लीत यमुना नदीची पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे यमुना नदीच्या काठावरील सखल भागात पुराचा धोका निर्माण होऊ लागला आहे. पूर नियंत्रण विभाग आणि सिंचन विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील जुन्या लोखंडी पुलाजवळील यमुना नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे, त्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि हथिनीकुंड बॅरेजमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे.
बॅरेजचे सर्व दरवाजे उघडल्याने पाण्याची पातळी कमी झाली : दरम्यान, दिल्ली सरकारने बॅरेजचे सर्व दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण जर पाण्याची पातळी आणखी वाढली तर धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासन लोकांना यमुना नदीच्या काठावर जाऊ नये आणि गुरा ढोरांनाही तिकडे जाऊ देऊ नये असे आवाहन करत आहे.
प्रशानसन अलर्ट मोडवर : दिल्ली सरकार आणि पूर नियंत्रण विभाग आणि सिंचन विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पूर नियंत्रण विभागाचे अधिकारी बॅरेजमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर आणि यमुनेच्या पाण्याच्या पातळीवर सतत लक्ष ठेवून आहेत. यासोबतच, संभाव्य बाधित भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच, लोकांनी यमुना नदीच्या काठावर जाऊ नये आणि गुरे ढोरे त्या दिशेने जाऊ देऊ नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यासही सांगण्यात आले आहे. पुढील 48 तासांत पावसाचा अंदाज : दुसरीकडे, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत उत्तर भारतातील पहाडी राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. जर हा पाऊस मुसळधार राहिला तर हथिनीकुंड बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो आणि त्याचा थेट परिणाम दिल्लीतील यमुनेच्या पाण्याच्या पातळीवर होईल. दरम्यान, प्रशासनाने अलर्ट जारी केला असून मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आवाहनदेखील केले आहे. परिस्थिती अजूनही नियंत्रणात असली तरी प्रशासन कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. दिल्ली जल मंडळ, सिंचन आणि पूर नियंत्रण विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
