दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टॅरिफ प्रकरणावर घेतलेल्या भूमिकेवरुन टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी टॅरिफ प्रकरणानंतर थेट उल्लेख न करता भाष्य करताना भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान आपण होऊ देणार नाही. यासाठी मला वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी चालेल असं विधान केलं. तसेच मोदींनी टॅरिफ नाट्यानंतर बोलताना स्वदेशीचा पुरस्कार करत स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर द्या असे म्हटले. याच मुद्द्यावरुन राऊतांनी मोदी स्वत: कोणकोणत्या परदेशी गोष्टी वापरतात याचा पाढाच वाचला आहे. तसेच भारत-पाकिस्तान संघर्षाच्या मुद्द्यावरुनही राऊतांनी मोदींना सुनालवे आहे.
स्वत: मोदी स्वदेशीचे किती अनुकरण करतात?
”अमेरिकेचे अध्यक्ष प्रेसिडंट ट्रम्प यांनी आतापर्यंत 34 वेळा सांगितले की, भारत-पाक युद्ध आपण थांबवले. यावर आपले लाडके पंतप्रधान मोदी यांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. त्यांच्या मौनातच युद्धबंदीचे रहस्य दडले आहे. मोदी हे भाजपच्या खासदारांसमोर आक्रमकपणे बोलतात. विरोधकांना शहाणपण शिकवतात, पण प्रेसिडंट ट्रम्प यांच्या भारतविरोधी वक्तव्यांपुढे ते नांगी टाकतात. प्रेसिडंट ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावले व दंडही आकारला. तरीही मोदी बोलायला तयार नाहीत. ”भारतीय लोकांनी आता परदेशी माल वापरू नये. स्वदेशी वस्तू घ्याव्यात” हे त्यांचे ‘टॅरिफ’वरचे उत्तर, पण स्वत: मोदी स्वदेशीचे किती अनुकरण करतात?” असा सवाल राऊत यांनी ‘सामना’मधील ‘रोठठोक’ सदरामधून उपस्थित केला आहे.
मोदी कोणत्या बॅण्डच्या गोष्टी वापरतात? राऊतांनी यादीच काढली
”भाजप नेत्यांची मुले परदेशात शिकतात. पुन्हा या सगळ्यांचा काळा पैसा विदेशी बँकेत. स्वदेशीची बात करणारे मोदी स्वत: जर्मन बनावटीची बीएमडब्ल्यू कार वापरतात. इटालियन बनावटीचा ॠळेीसळे अीारपळ सूट वापरतात. केनेथ कोल या अमेरिकन कंपनीचे बूट वापरतात. रॉजर डुबुआ या इटालियन कंपनीचे घड्याळ, लेेशीि र्ींळीळेप (आशीळलर) चा चष्मा आणि अमेरिकेचा आयफोन वापरतात. मुख्य म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी ते अमेरिकेत जातात व जनतेला ट्रम्प यांना विरोध म्हणून स्वदेशी माल घ्यावा असे सांगतात, हा विनोद आहे,” असे म्हणत राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
