वॉशिंग्टन / महान कार्य वृत्तसेवा
येत्या शुक्रवारी म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. ही बैठक प्रामुख्याने रशिया आणि युक्रेनमधील शांती कराराच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित असण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रम्प ट्रूथ सोशल अकाऊंटवर ही माहिती शेअर केलीय. तत्पूर्वी व्हाईट हाऊसमध्ये आर्मेनिया-अझरबैजान शांतता करारावर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी रशियाऱ्युक्रेन संघर्षावर प्रगतीचे संकेतही दिलेत.
अमेरिकेची जगात शांतता आणि स्थैर्य आणण्याची आकांक्षा : ट्रम्प म्हणाले की, ‘मी आलो तेव्हा संपूर्ण जगानं स्वत:ला आगीत झोकून दिले होते आणि हे सर्व घडत होते. आम्हाला इथे येऊन फक्त सहा महिने झाले आहेत. जग आगीत होरपळत होते आणि आम्ही जवळजवळ प्रत्येक आगीवर नियंत्रण मिळवलंय. आम्ही रशिया आणि युक्रेनसह आणखी एका आगीवर खूप जोरदार काम करीत आहोत. अमेरिकेची आकांक्षा जगात शांतता आणि स्थैर्य आणण्याची आहे. आर्मेनिया-अझरबैजान करारादरम्यान रशियाऱ्युक्रेन शांतता प्रयत्नांबद्दल विचारले असता ट्रम्प म्हणाले, ‘तुम्हाला माहिती आहे की, गेल्या दीड महिन्यात रशियाने सुमारे 25000 लोक गमावले आहेत.
आम्ही शांती कराराच्या खूप जवळ : त्यांनी पुढे सांगितले की, युक्रेनमध्ये फक्त काही लोकांचा मृत्यू झालाय आणि अजूनही बरेच लोक मृत्युमुखी पडत आहेत. अमेरिका ही लढाई थांबवण्याच्या खूप जवळ येत आहे. आम्ही अलास्कामध्ये रशियाशी बैठक घेऊ. हे ठिकाण अनेक कारणांमुळे खूप चर्चेत येणार आहे. चर्चा किती पुढे गेली आहे असे विचारले असता ट्रम्प म्हणाले की, ‘आम्ही शांती कराराच्या खूप जवळ येत आहोत. खूप चांगले लोक आणि नेते असलेल्या युरोपियन देशांसोबत नाटोच्या माध्यमातून काम करणे खूप आनंददायी गोष्ट आहे.’ मी त्यांच्याशी खूप मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेत आणि 2 ते 5 टक्क्यांनी सहमत झालोय. आम्ही एकत्रित खूप जवळून काम करीत आहोत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी पूर्णत: प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर आपण काही काम पूर्ण करू शकलो, तर त्यांना आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट मिळत आहे. दोघांच्या हितासाठी काही प्रदेशांची देवाणघेवाण होणार : मी लवकरच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भेटणार आहे. ही भेट आधीही होऊ शकली असती, परंतु मला वाटते की, काही सुरक्षा व्यवस्था आहेत, ज्या दुर्दैवाने लोकांना कराव्या लागतील.’ ट्रम्प यांनी असेही म्हटले की, युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या करारात काही प्रदेशांची देवाणघेवाण समाविष्ट असेल. ते खूप गुंतागुंतीचे आहे, परंतु आपण काही प्रदेश परत मिळवणार आहोत आणि आपण काही प्रदेश देखील बदलू शकतो. ते म्हणाले, ‘दोघांच्या हितासाठी काही प्रदेशांची देवाणघेवाण होणार आहे, परंतु आपण त्याबद्दल नंतर किंवा उद्या बोलू,’ असेही त्यांनी स्पष्ट केलेय.
