Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी समोर आली आहे. सलमान खानचा बॉडीगार्ड शेफावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक वर्ष सलमानच्या पाठीशी सावलीप्रमाणे असणाऱ्या शेराच्या खऱ्या आयुष्यातील सावलीच हरपली आहे. शेराने त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती गमावली.  शेराच्या वडिलांचं निधन झालं. शेराला पितृशोक झाला असून त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

शेरा हा सलमान खानचा अनेक वर्ष बॉडीगार्ड आहे. सलमान खानच्या मागे तो सावलीप्रमाणे उभा असतो. शेराला पितृशोक झाल्याचं कळताच सलमान खान त्याला आधार देण्यासाठी उभा राहिला. शेराचे वडील मागील अनेक दिवस ते कॅन्सरनं ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली.

सुंदर सिंह जॉली असं शेराच्या वडिलांचं नाव होतं. ते 88 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून ते कॅन्सरशी लढत होते. उपचारांची अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शेरा प्रचंड दु:खात आहे. सेराने अधिकृत माहिती दिली आहे. त्याच्या वडिलांचं पार्थिव संध्याकाळी 4 वाजता त्याच्या राहत्या घरी म्हणजेच 1902 द पार्क लग्झरी रेजीडेन्स, ओशिवरा, अंधेरी येथे ठेवण्यात येणार आहे.

शेरा आणि त्याच्या वडिलांच्या नातं खूप अतुट होतं. वडिलांवर त्याचं जिवापाड प्रेम होतं. ते एक आदर्श वडील होते. मार्च महिन्यात त्यांच्या बर्थडे होता तेव्हा शेरानं त्यांच्यासाठी भावुक पोस्ट लिहिली होती. माझी प्रत्येक शक्ती तुमच्यामुळे आहे. पप्पा तुम्ही माझ्यासाठी देव आहात.

शेराच्या वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच सोशल मीडियावर अनेक जण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अनेक सेलिब्रेटींनी सांत्वन करत शेराची भेट घेतली. शेराबद्दल सांगायचं झाल्यास, शेराचं खरं नाव गुरमीत सिंह असं आहे. तो 3 दशकांपासून सलमान खानबरोबर त्याची सावली बनून उभा आहे. सलमान खान शेराला त्याच्या घरातील एक सदस्यच मानतो. सलमान खानचं कोणतंही शूट, कुठेही सातासमुद्रापार असो शेरा तिथे उपस्थित असतो. सलमान खानच्या काही विश्वसनीय व्यक्तींपैकी एक शेरा आहे.