चौकशी करण्याची ओबीसी संघटना जिल्हाध्यक्ष शकील अत्तार यांची मागणी
हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा
तालुका कृषी अधिकारी अभिजीत गडदे व सहाय्यक मिसाळ यांनी 2021 पासून 2025 पर्यंत अनेक गैरव्यवहार केले आहेत. बोगस बिले लावून प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. असा आरोप ओबीसी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शकील अत्तार यांनी केला असून त्या दोघांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे अशी जोरदार मागणी अत्तार यांनी केली आहे.
ते म्हणाले, 2021 पासून 2025 पर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भरमसाठ गैरव्य व्यवहार करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या आहेत. आम्ही वारंवार चौकशी केली तर आम्हाला उडवा उडवी ची उत्तरे देण्यात आली. याचबरोबर माहिती अधिकार कायद्याद्वारे माहिती मागितली असता ती देण्याची टाळाटाळ केली व दिलेली माहिती ही अपुरीच दिली त्याचबरोबर आपिलात जाण्याची आम्ही तयारी दर्शवली असता आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी करत आहे. त्यामुळे या दोन अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होऊन कारवाई करावी तसेच अनेक बोगस बिल लावून शासनाचे पैसे लाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे यांची रीतसर तक्रार करणार आहे असे शकील अत्तार यांनी सांगितले.
