15 दिवसांनंतही परिस्थिती जैसे थे ; पंचगंगासमोरील अतिक्रमण प्रकरण
गंगानगर/ महान कार्य वृत्तसेवा
गंगानगर येथील पंचगंगा साखर कारखान्याच्या भिंती लगत असेल्या अतिक्रमीत खोकीधारकांनी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या नोटीलसला कात्रजचा घाट दाखवला आहे. नोटीसची मुदत संपल्यानंतरही अतिक्रमण न काढल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक अक्षरश : वैतागले आहेत. तर प्रकरणाला अर्थपूर्ण वाटाघाटी वासही येत अस्ाल्याची चर्चा आहे.
दरम्यान सोमवार 4 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होत असलेल्या लोकशाही दिनात हे प्रकरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर हातकणंगले सार्वजनीक बांधकाम विभागाने 15 जुलै रोजी 21 खोकीधारकांना आठ दिवसांची मुदत देत अतिक्रमणे स्वताहून काढून घेण्याच्ाी नोटीस बजावली. यास 17 दिवस झाले तरीही अतिक्रमणे काढूण घेण्यात आलेली नाहीत. अथवा नोटीसची मुदत संपल्यानंतरही बांधकाम विभाग गांधारीच्या भुमिकेत दिसते.
सर्वाजनीक बांधकाम विभागाची दुटप्पी भुमिका
सार्वजनिक बांधकाम खात्याने सदरचा रस्ता पन्हाळा वाघबीळ पासून शिवनाकवाडीपर्यंत 192 किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण असताना सुद्धा केवळ पंचगंगा साखर कारखान्यासमोरील खोकीधारकांनाच नोटीस बजावली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाची दुटप्पी भूमिका दिसते.
