Spread the love

वाराणसी (उत्तर प्रदेश) / महान कार्य वृत्तसेवा

पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आज (2 ऑगस्ट) जमा होण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाराणसीमध्ये आहेत. तेथील कार्यक्रमात ते विविध विकास योजनांचे उद्धघाटन करतील. त्याचवेळी ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील.

लाभार्थ्यांना मिळतात 2000 रुपये : या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये वर्षाला जमा केले जातात. ऊँऊ माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यात आला होता. त्यानंतर 20 व्या हप्त्‌‍याची प्रतिक्षा शेतकरयांना होती. रक्कम जमा झाली का ह कसे तपासावे? : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता पात्र शेतर्कयांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना फायदा होणार नाही. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घरबसल्या तपासता येईल. ज्स्व्ग्ेरह.ुदनब.ग्ह या वेबसाईटला भट द्या. त्यानंतर शेतकरी कॉर्नर या पर्यायावर क्लिक करा. लाभार्थ्यांच्या यादीवर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक नोंदवा. उूा ऊरूर वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.