25 ते 28 जुलै पर्यंत होत बुकिंग, पावतीही सापडली
पुणे / महान कार्य वृत्तसेवा
पुणे शहरातील खराडी परिसरात काल (शनिवारी) रात्री एका फ्लॅटवर सुरु असलेली रेव्ह पार्टी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांकडून चार पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या रेव्ह पार्टीत कोकेन आणि गांजा या अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. तर ही पार्टी आयोजित केलेल्या हॉटेल बुकिंग हे प्रांजल यांच्या नावे असल्याचे समोर आले आहेत.
प्रांजल खेवलकर यांच्या नावाने हे बुकिंग केल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्या देखील समोर आल्या आहेत. 25 ते 28 जुलै पर्यंत हे बुकिंग करण्यात आलेलं होतं. रूम नंबर 101 आणि रूम नंबर 102 खेवलकर यांच्या नावाने बुक होत्या. 10 हजार 357रुपये असे याचे भाडे होते. एका रूमचे बुकिंग 25 ते 28 तर दुसऱ्या रूमचे बुकिंग 26 ते 27 जुलै दरम्यान करण्यात आलं होतं. या माहितीनंतर आता ही पार्टी प्रंजल खेवलकर यांनीच आयोजित केली होती का अशी चर्चा सुरू झाली आहे.
कोण आहेत प्रांजल खेवलकर?
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत, पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून लांब आहेत. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे, पुण्यात या रेव्ह पार्टीमध्ये सापडल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
छापेमारीचा पहिला व्हिडीओ आला समोर
खराडीतील ज्या हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती, त्या ठिकाणी मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या छापेमारीचा व्हिडीओ देखील समोर आला आहेत. ज्यावेळी पोलिसांनी संबंधित फ्लॅटमध्ये छापा टाकला. तेव्हा या पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयासह इतर चार पुरुष आणि तीन महिला आढळून आल्या. सर्वजण हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी करत असल्याचं समोर आलं. अमली पदार्थ, हुक्का आणि दारुसाठा सापडला असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. सविस्तर तपास सुरू आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
