पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा
शुक्रवारी रात्री उशिरा पुलाची शिरोली येथील यादववाडी भागात असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये वेश्या व्यवसाय प्रकरणी छापा टाकण्यात आला आहे.
शिरोली येथील यादववाडी भागात गेले काही दिवस वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती.त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा सापळा रचून छापा टाकण्यात आला. याठिकाणी दोन बांगलादेशी तरुणी मिळून आल्या असता त्यांची त्याठिकाणाहून सुटका करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांना कल्लेश चंद्रकांत खेकरे,रा.पुलाची शिरोली(वय-२५) व बाबू बाळू पोवार रा.वारणा कोडोली(वय- २०) या दोघांनी या तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणून ठेवले होते. या दोघांविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत एक चारचाकी, एक मोटारसायकल, ५ मोबाईल संच, असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाने केली आहे.
