Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

पुण्यात मध्यंतरी अंमली पदार्थांची मोठी कारवाई पुणे पोलिसांकडून करण्यात आली होती. ज्यात हजारो किलो अंमली पदार्थ पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते. असं असताना आता पुणे विमानतळावर कस्टम विभागाच्या वतीने मोठी कारवाई करीत एका प्रवाशाकडून 10.47 किलोग्रॅम हायड्रोपोनिक मारिजुआना जप्त करण्यात आले असून, ज्याची किंमत अंदाजे 10.5 कोटी रुपये इतकी आहे.

अटकेत असलेल्या प्रवाशाची वागणूक ही संशयास्पद : अंमली पदार्थाच्या प्रकरणात कस्टम विभागाकडून अभिनय अमरनाथ यादव या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 जुलै रोजी पुणे विमानतळावर इंडिगो फ्लाइट क्रमांक 6ए-1096 ने तो बँकॉकहून उतरला असता. खरं तर अटकेत असलेल्या प्रवाशाची वागणूक ही संशयास्पद असल्याच्या कारणाने कस्टम अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता, त्यांना त्याच्याजवळ 10.47 किलोग्रॅम हायड्रोपोनिक वीड आढळून आली, ज्याची किंमत अंदाजे 10.5 कोटी रुपये आहे. त्यानंतर तत्काळ कस्टम विभागानं जी जप्त केली असून, गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुणे कस्टम्सचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करतायत : आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडीसाठी मजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले आहे. पुणे कस्टम्सचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून, मादक पदार्थांच्या तस्करीमागील संभाव्य आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा शोध घेतला जात आहे.