पुणे / महान कार्य वृत्तसेवा
पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये असलेल्या अनेक समस्यांबाबत आधी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पहाटेच्या सुमारास पाहणी केली. यावेळी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये दिसून आले. त्याचबरोबर हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना देखील सुनावल्याचं दिसून आलं. त्याचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी अजित पवार म्हणाले, माझा आवाज थोडा मोठा आहे.
तुम्ही लगेच टीव्हीला दाखवता, अजित पवारांनी अमक्याला झापलं तमक्याला झापलं. मला सगळ्यांबद्दल आदर आहे. सगळे आम्हाला सहकार्य करतात, सगळ्यांचा आदर करुन आमचे सगळे सहकारी मदत करतात, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
माझा आवाज थोडा मोठा आहे. तुम्ही लगेच टीव्हीला दाखवता, अजित पवारांनी अमक्याला झापलं तमक्याला झापलं. मी काय कोणाला झापायला आलो नाही. सगळेजण आम्हाला सहकार्य करत आहेत. सर्वांचा आदर ठेवून आम्ही अधिकारी, त्यांच्या हाताखालचे सहकारी मदत करत आहेत, सर्वांच्या सहकार्यांने आम्ही सोबत पुढे काम करत आहोत, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
नेमकं काय प्रकरण?
आज पहाटेच्या सुमारास अजित पवारांनी हिंजवडीतील पाहणी केली त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली, सरकारी कामाच्या आड कोण येत असेल कर त्यांच्यावर 353 लावा अशा सूचनाही अजित पवारांनी यावेळी अधिकाऱ्यांनी दिल्या, त्यानंतर पाहणी करून निघत असताना हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर हे अजित पवार यांच्याशी बोलत असताना त्यांनी खडेबोल सुनावल्याचं दिसून आलं. त्यावरती आज माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, माझा थोडा आवाज मोठा आहे.
तुम्ही लगेच टीव्हीला दाखवता, अजित पवारांनी अमक्याला झापलं तमक्याला झापलं. मला सगळ्यांबद्दल आदर आहे.
सरपंचाना अजित पवार काय म्हणाले?
कामाची पाहणी करत असताच अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना देखील सुनावल्याचं दिसून आलं. ते सरपंच अजित पवारांशी बोलत असताना ते म्हणाले, अहो असू द्या हो असू द्या हो साहेब, धरण करताना मंदिर जातातच की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो…आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बाहेर चाललाय…माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर….बेंगलोरला हैदराबादला …काय तुम्हाला पडलं नाही….कशाला मी सहा वाजता पाहणी करायला येतो इथं, मला कळत नाही माझी माणसं नाहीत…हे केल्याशिवाय गत्यंतर नाही… असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर खडेबोल सुनावले आहेत.
कोणीही मध्ये आलं तर त्यावर 353 टाका अजित पवारांनी पहाटेच घेतली अधिकाऱ्यांची शाळा घ्यायला सुरूवात केली. आपलं असं ठरलंय कामाच्यामध्ये कोणी आला तर त्यावर 353 दाखल करा.तो कोणीही असेल तरी करा.अजित पवार जरी मध्ये आला तरी 353 दाखल करायचा. बाकीचं कोणाचं काय ठेवायचंच नाही. 353 लावायचा कारण त्याच्याशिवाय हे काम होणार नाही. नाही प्रत्येक जण माझं हे करा माझं ते करा असं करत राहिलं,आपल्याला संपूर्ण काम करून टाकायचं आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.
