हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासह, मुंबईसह एकसंघ महाराष्ट्र यामध्ये अण्णाभाऊ साठे यांची योगदान अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या लोककला शाहिरीच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राचा लढा यशस्वी करून दाखवला त्यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवूया या, असे आवाहन हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर हातले पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमातून साजरी करावी. जयंतीचे औचित्य साधून ग्रंथ दिंडी सह इतर कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचे साहित्यातील योगदानाचा सन्मान करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक शरद मेमाने यांनी केले.
बैठकीच्या पूर्वसंध्येलाच पोलिस निरीक्षक मेमाने यांनी उपस्थित कार्यकर्त्याना आण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल विचार मांडायला सांगितले. त्यानंतर आण्णाभाऊ साठे यांची जयंती डॉल्बी मुक्त शांततेत साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ही मेमाने यांनी केले. तसेच जयंतीचे औचीत्य साधून आण्णाभाऊ साठे याच्या लेखनितून आजरामर ठरलेल्या कांदबीरींचे वाटप करावे असे ही त्यांनी सांगीतले.
बैठकीला गोपनिय अधिकारी मदन मधाळे, विलास कांबळे, विजय कांबळे, सागर तिवडे, उत्कर्ष सकटे, संजय लोंढे, आकाश घाटगे यांच्यासह पोलीस ठाणे हद्दीतील नागरीक उपस्थित होते.
