मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. उपकर्णधार ऋषभ पंत फलंदाजी करत असताना गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला तात्काळ ऍम्ब्युलन्सने रुग्णालयात स्कॅनसाठी नेण्यात आलं. पंत 48 चेंडूत 37 धावा काढल्यानंतर रिटायर हर्ट झाला. क्रिस वोक्सच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना टीम इंडियाचा उपकर्णधार जखमी झाला. बीसीसीआयने त्याच्या दुखापतीवर अधिकृत अपडेट जाहीर केलं आहे.
पाय सुजला, रक्तही आलं
खेळाच्या 68व्या षटकात पंतने क्रिस वोक्सच्या फुलटॉस चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो शॉट पूर्णपणे चुकला आणि चेंडू थेट त्याच्या उजव्या पायाच्या बुटावर आदळला. लगेचच पंत वेदनेने विव्हळत पडला, आणि मैदानात फिजिओ दाखल झाला. पंतने बूट काढला तेव्हा पायातून हलकंसं रक्त येताना दिसलं आणि काही वेळातच सूजही दिसून आली. त्याला चालता येत नव्हतं, म्हणून ऍम्ब्युलन्स मैदानात बोलावून त्याला बाहेर नेण्यात आलं.
ँण्ण्घब चा अधिकृत निवेदन
ँण्ण्घब कडून ऋषभ पंतच्या दुखापतीवर निवेदन जाहीर करण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे, ”मँचेस्टर कसोटीत पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना ऋषभ पंतच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्याला पुढील तपासणीसाठी स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.”
पहिल्या दिवशी भारताची मजबूत स्थिती
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल (58) आणि केएल राहुल (46) यांनी 94 धावांची दमदार सलामी भागीदारी केली. त्यानंतर शुभमन गिल फॉर्मात दिसला नाही आणि फक्त 12 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने सकारात्मक फलंदाजी करताना 37 धावा केल्या, पण दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. साई सुदर्शनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक (61) साजरे केलं, पण नंतर तोही बेन स्टोक्सकडून बाद झाला.
दिवसअखेर भारताची स्थिती मजबूत असून 4 बाद 264 धावा झाल्या आहेत. सध्या रवींद्र जडेजा (19ङ) आणि शार्दुल ठाकूर (19ङ) क्रीजवर आहेत आणि दुसऱ्या दिवशी भारताचा डाव पुढे सुरू होईल. मँचेस्टर कसोटीत पहिल्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाची अवस्था थोडीशी संमिश्र ठरली. कर्णधार शुभमन गिलला पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही. तो फक्त 12 धावा करून बेन स्टोक्सच्या चेंडूवर बाद झाला.
