इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
मेफेड्रॉन एमडी ड्रग्ज प्रकरणात शहापूर पोलिसांनी आणखी दोघा संशयितांना अटक केली. विनीत सुकुमार गंथडे (वय 32, रा. सावली सोसायटी शहापूर), आकाश रमेश माने (वय 23, रा. रेणुकानगर, यड्राव) अशी त्यांची नावे आहेत.त्यांच्याकडून 2.300 मिलिग्रॅम असा सुमारे 11 हजार रुपयांचे मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले आहे, अशी माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक महावीर कुटे यांनी दिली.
दरम्यान वृषभ चार दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. वृषभ पोलिसांना दररोज वेगवेगळी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे पोलिसांनी वृषभच्या सीडीआरची माहिती मागविली आहे. या माहितीच्या आधारे इचलकरंजी शहर परिसरातील अनेकांची नावे समोर आली असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.वृषभच्या संपर्कातील अनेकांची नावे पोलिसांनी काढली आहेत. यामुळे पूर्वी वृषभच्या संपर्कात असलेल्या कोल्हापूर, इचलकरंजी, शहापूर, तारदाळ, खोतवाडी, यड्राव, कोरोची, कबनूर, चंदूर आदी परिसरातील महाविद्यालयीन युवक, उद्योजक, व्यापारी, गुन्हेगार यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे.
