अहिल्यानगर / महान कार्य वृत्तसेवा
अहिल्यानगर येथून एक धक्कादायक बातमी समोर समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एकवीस वर्षीय विवाहित महिलेने किरण काळे विरोधात गुन्हा दाखल केल्याने राजकीय वतुर्ळात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात सतत वाद होते. या वादातून मदत मिळण्याकरिता पीडिता महिला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे एकमेकांच्या संपर्कात आले होते. पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष दाखवून शहर प्रमुख किरण काळे याने महिलेवर बलात्कार केला.
किरण काळे पोलिसांच्या ताब्यात
2023 ते 2024 पर्यंत किरण काळे याने स्वत:च्या संपर्क कार्यालयात बलात्कार केला. तसेच ही गोष्ट कोणाला कळली तर जीवे मारण्याची धमकी किरण काळेकडून देण्यात येत होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात किरण काळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण काळेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ठाकरे गटाला मोठा धक्का
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागल्याचे दिसून येत आहे. एकामागे एक नेते हे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून महायुतीतील घटक पक्षात सामील होत आहेत. एकीकडे ठाकरे गटातील नेत्यांची गळती थांबवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर असतानाच अहिल्यानगरच्या शहर प्रमुखावर गुन्हा दाखल झाल्याने हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, अहिल्यानगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता शहरातून एकाचा दिवशी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे. सावेडी उपनगरात राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी (15) ही 19 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली. याआधी रात्री किरकोळ कौटुंबिक वाद झाला होता. मुलीचा मोबाईल देखील बंद असून ती कोणालाही न सांगता निघून गेल्याने आणि अद्याप परत न आल्याने तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या मुलीला (15) देखील 19 जुलैच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीच्या अपहरणाबाबत तपास सुरू असून, तिच्या शोधासाठी पोलिसांचे आहे.
