इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांची पेन्शन पंधराशे वरून अडीच हजार अशी एक हजार रुपयाची भरीव वाढ केल्यामुळे इचलकरंजी येथील दिव्यांग बांधवांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर व माजी संजय गांधी कमिटी अध्यक्ष अनिल डाळ्या यांचे आभार मानले. यावेळी भाजपा ऑफीस इचलकरंजी येथे हळवणकर साहेबांच्या हस्ते साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांनी पेन्शन मध्ये वाढ करण्याची मागणी केली होती संजय गांधी निराधार मंजुरी पत्र वाटपाच्या वेळी भाजप नेते व संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर या इचलकरंजी नगरीचे लोकप्रिय आमदार डॉ राहुल आवाडे यांच्या मार्फत ही मागणी केली होती त्याचा निर्णय लागून या पेन्शनमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या आनंदाचे वातावरण आहे याप्रसंगी सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजकुमार गेजगे, भाजपा दिव्यांग आघाडी अध्यक्ष दीपक लोखंडे, दिव्यांग सेवा संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, भाजप शहर उपाध्यक्ष प्रदीप मळगे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सदस्य अमृत मामा भोसले मनोज हिंगमिरे इचलकरंजी पश्चिम भाजपाध्यक्ष शशिकांत मोहिते माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मनोज हिंगमिरे ,किसन शिंदे, दीपक पाटील ,धोंडीराम जावळे, संजय नागोरी. युवराज माळी नितीन चव्हाण .सलीम शिकलगार मोहन साखरे राजू गुरव दीपक निर्मळे शहाजान टाकळगी व अनेक मान्यवर उपस्थित होते
