Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ साठी होणाऱ्या परीक्षेसाठी 84774 उमेदवारांनी अर्ज केले होते. पालिकेने या परीक्षेसाठी 16 ते 19 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील 12 जिल्हयांमधील 28 परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षेचे आयोजन केले होते.त्यात दिली. 16 ते 19 जुलै या परीक्षेच्या 4 दिवसात 84774 उमेदवारांपैकी 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली. सर्व केंद्रांवरली परीक्षा प्रक्रिया व्यवस्थित रितीने पार पडली.

महापालिकेतील भरतीसाठी गट – क आणि गट – ड मधील 30 संवर्गातील 668 पदांकरिता टाटा कन्सल्टन्सी सर्व्‌ि‍हस यांच्या माध्यमातून परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते या परीक्षा प्रक्रियेवर निरीक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्ग 1 श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘समन्वय अधिकारी ‘म्हणून तसेच 29 अधिकाऱ्यांची ‘केंद्र निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. चार दिवस एका दिवशी 3 सत्रात परीक्षा घेण्यात आली.

सकाळी 9 ते 11 वा, दुपारी 1 ते 3 व सायंकाळी 5 ते 7 या वेळात परीक्षा घेण्यात आली . अशाप्रकारे नमुंमपा सरळसेवा भरती प्रक्रियेतपदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 21515 उमेदवारांनी, दुस-या दिवशी 18442 उमेदवारांनी, तिस-या दिवशी 15064 उमेदवारांनी व चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. अशाप्रकारे चार दिवसात 68149 उमेदवारांनी 28 केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे. चार दिवसांची ही संपूर्ण परीक्षा एका केंद्रावरील पर्यवेक्षकाने मदतीच्या केलेल्या प्रयत्ना व्यतिरिक्त संपूर्ण भरती प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने पार पडली आहे.भरतीविषयक कोणत्याही भूलथापांना व आमिषांना बळी न पडता तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.