नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी शनिवारी रात्री त्यांर्च्या ें अकाऊंटवरून एक घोषणा केलीय. त्यांर्नी ेंअघब कंपनीमार्फत ‘बेबी ग्रॉक’ नावाचं मुलांसाठी खास तयार केलेलं अघब चॅटबॉट लॉंच करण्याची योजना जाहीर केली. ही घोषणा ‘ग्रॉक’ या मूळ अघब चॅटबॉटच्या अलीकडील वादग्रस्त वर्तनानंतर आली आहे, ज्यामध्ये ‘व्हाइट जेनोसाईड’ आणि ‘मेका हिटलर’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर चर्चा झाल्यानं टीका झाली होती. मस्क यांनी सांगितलं की, ‘बेबी ग्रॉक’ हा मुलांसाठी सुरक्षित, शैक्षणिक आणि आकर्षक अनुभव प्रदान करेल. या ॲपबद्दल अधिक तपशील अद्याप समोर आले नसले, तरी हे ॲप पूर्णपणे मुलांसाठी योग्य आणि पालकांच्या नियंत्रणाखाली असेल, असं सांगितलं जात आहे.
एलोन मस्क यांर्नी ें वर एका पोस्टद्वारे सांगितलं की, ”आम्ही ‘बेबी ग्रॉक’ तयार करत आहोत, जो मुलांसाठी खास ॲप असेल.” हा ॲर्प ेंअघब च्या विद्यमान ‘ग्रॉक’ चॅटबॉटपेक्षा वेगळा असेल आणि मुलांसाठी सुरक्षित आणि शैक्षणिक संवाद प्रदान करण्यावर भर देईल. ‘बेबी ग्रॉक’ विशेषत: मुलांच्या वयानुसार योग्य प्रतिसाद देईल, ज्यामध्ये संवेदनशील किंवा प्रौढ विषयांचा समावेश नसेल. यामध्ये पालक नियंत्रण आणि सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश असेल, ज्यामुळं पालकांना त्यांच्या मुलांच्या ऑनलाइन अनुभवाबाबत निश्चिंतता मिळेल. ॲपच्या प्रशिक्षण डेटा आणि सिस्टम सूचना काळजीपूर्वक तयार केल्या जातील, जेणेकरून मुलांना केवळ सुरक्षित आणि उपयुक्त माहितीच मिळेल.
दरम्यार्न, ेंअघब च्या ‘ग्रॉक’ चॅटबॉटवर काही वादग्रस्त वक्तव्यांमुळं टीका झाली. यापूर्वी ग्रॉकनं दक्षिण आफ्रिकेतील ‘व्हाइट जेनोसाईड’ आणि ‘मेका हिटलर’ यांसारख्या विषयांवर चर्चा केली होती, ज्यामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय, अलीकडेर्च ेंअघब नं ‘आनी’ नावाचं अघब अवतार सादर केलाय, जो प्रौढांसाठी डिझाइन केलेला आहे. या अवतारच्या फ्लर्टी संवाद आणि सौम्य स्वरूपामुळंही टीका झाली, कारण ‘किड्स मोड’ निवडल्यानंतरही त्यात फारसा फरक पडत नसल्याचं वापरकर्त्यांनी सांगितलं.
या पार्श्वभूमीवर, ‘बेबी ग्रॉक’ ही घोषर्णा ेंअघब ची प्रतिमा सुधारण्याचा आणि मुलांसाठी सुरक्षित अघब पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मानला जात आहे. मस्क यांनी सांगितलं की, ‘बेबी ग्रॉक’ हा पूर्णपणे वेगळा उपक्रम असेल, जो मुलांच्या शिक्षण आणि मनोरंजनावर केंद्रित असेल’. मस्क यांचा हा उपक्रम ध्जहअघब च्या ण्प्रूउझ्ऊ, उददुत च्या उास्ग्हगब आणि अहूप्ीदज्ग्मब च्या ण्त्रलब यांसारख्या स्पर्धकांशी टक्कर देण्यासाठी सुरू करत आहे. ‘बेबी ग्रॉक’ मुलांसाठी अघब च्या क्षेत्रात एक नवीन पाऊल ठरू शकतो. याबाबत अधिक तपशील आणि लॉंचची तारीख लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
