Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

तुम्हीदेखील तुमच्या बाळाला पाळणाघरात ठेवताय? तर गोरेगावमध्ये घडलेली एक घटना तुम्हाला माहिती असायलाच हवी. सात वर्षांच्या चिमुरडीवर पाळणाघर चालवणाऱ्या व्यक्तीने लैंगिक आत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. 44 वर्षीय नराधमाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने व्हिडिओ गेम दाखवण्याच्या बहाण्याने चिमुरडीला बेडरुममध्ये नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले आहे.

चिमुरडीने पाळणाघरात जायला नकार दिल्याने पालकांना संशय आला. तेव्हा त्यांनी चिमुरडीला याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने घडलेल्या प्रकाराचा उलगडा पालकांसमोर केला. तेव्हा पालकांना धक्काच बसला. पालकांनी लगेचच पोलिसांत धाव घेत पाळणाघरात शिकवत असलेल्या आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पाळणाघरातील इतरही मुलांचा छळ झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघे मिळून हे पाळणाघर चालवत होते. तर आरोपी हा पाळणाघरातील मुलांना शिकवतदेखील असे. पीडित चिमुरडीचे पालक हे दोघेही नोकरी करणारे आहेत. मुलगी शाळेनंतर डेकेअर सेंटरमध्येच जात असे. या सेंटरमध्ये त्याच परिसरातील 4 ते 11 वयोगटातील मुलं येतात. त्यापैकी बहुतेकांचे पालक काम करतात. आरोपी आणि त्याची पत्नी मुलांची काळजी घेण्याची आणि त्यांना शिकवण्याची जबाबदारी होती. सोमवारी रात्री पीडितेने डेकेअरला जाण्यास नकार दिला आणि तिच्या पालकांना सांगितले की आरोपीने तिच्यासोबत दुषकृत्य केले.

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, आरोपीने मुलीला बेडरूममध्ये गेम खेळण्यासाठी मोबाईल फोन दिला आणि तिचे लक्ष नसताना तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर इतर अनेक पालक पुढे आले असून त्यांनी आरोप केला आहे की, त्यांच्याही मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आले. भारतीय न्याय संहिता (ँऱ्ए) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (झ्ध्ण्एध्) कायद्याच्या संबंधित कलमांखाली मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.