Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला असताना कोकण मुंबई उपनगरासह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी लागली .हवामान विभागाने सर्व दूर पावसाचा इशारा दिला असला तरी मराठवाड्यात परभणी वगळता उर्वरित भागात गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाचा खंड आहे . काही भागात पावसाच्या हलक्या सरी होत्या . बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे .मात्र पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे .अजून काही दिवस अशीच स्थिती राहिली तर पेरण्या वाया जाऊ शकतात अशी भीती व्यक्त होत आहे .

परभणीत जोरदार पाऊस, पिकांना मोठा दिलासा

परभणी जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची परिस्थिती गंभीर झाली असतानाच वरुण राजाने परभणीकरांची आर्त ऐकली. आज पहाटे परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावलीय. ज्यामुळे अनेक ठिकाणी ओढ्याला पाणी आले आहे.सेलू शहरातील देवुळगाव गात येथील कसुरा नदीलाही पाणी आले आहे.सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.सेलू शहरातील सेलू शहरातील तेली गल्ली.अरब गल्ली नाला रोड परिसरात नागरिकांच्या घरात पाणी च पाणी झाले असुन आन्न धान्य व संसार उपयोगी साहित्यचे या पावसात नुकसान झाले आहे.दुसरीकडे अनेक ठिकाणी शेतात पाणीही साचले आहे.

लातूर जिल्ह्यात मागील 28 दिवसापासून पावसाचा खंड….

आज पहाटे आणि सकाळी काही भागात पावसाच्या मध्यम सरी येऊन गेल्या. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 101.8 मिलिमीटर पाऊस झालाय. गतवर्षी या कालावधीत झालेल्या पावसाच्या तुलनेत 188  मिमी पावसाची तूट आहे.

बीडसह जालन्यात महिनाभरापासून पावसाचा खंड

बीड मधील परळी, अंबाजोगाई माजलगाव तालुक्यात महिनाभरापासून पावसाची प्रतिक्षा होती काल रात्री पासून या तालुक्यात पाऊस पडलाय तर अद्यापही केज,धारूर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा आहे या तालुक्यात साधारण महिनाभरापासून पाऊस झाला नाही.

जालना जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाचा खंड पडला असून सर्वदूर पावसाची अपेक्षा असताना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कधी भुरभुर वगळता पाऊस पूर्ण गडप झालाय, दररोज ढगाळ वातावरण आहे ,मात्र पावसाचा पत्ता नाही, ही स्थिती पुढील आणखी काही दिवस राहिली तर पेरणी वाया जाऊ शकते .

पुढील चार दिवस काय इशारा? प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, छत्रपती संभाजीनगर, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची तर काही ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्यांचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे. आज (17 जुलै) नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आलाय. हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये हलक्या पावसचा इशारा आहे. 18 जुलै रोजी हिंगोली, परभणी व नांदेड जिल्हयाला यलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.