कोथरुडच्या महिलेला जादूटोण्याच्या बहाण्यानं फसवलं, अडीच लाखांचा गंडा
पुणे / महान कार्य वृत्तसेवा
पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, कोथरुडच्या काकूंना सोन्याचा हांड्याचं आमिष दाखवत जादुटोणा करुन कोरेगाव पार्कमधील भोंदूबाबाने 2 लाख रूपयांना लुटल्याची घटना समोर आली आहे. कोरेगाव पार्कमधील परिसरात सोन्याचा हंडा मिळिवण्यासाठी जादूटोणा करून लाखो रूपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी महंमद खानसाहेब जान मदारी नावाच्या भोंदूबाबाला याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भोंदूबाबाने दिलेल्या सोन्याच्या हंड्यात 15 दिवसांनी माती निघाली, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.
कोरेगाव पार्क परिसरात सोन्याचा हंडा मिळिवण्यासाठी जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला कोरेगाव पार्क पोलिसांनी ठोकल्या आहेत. महंमद खानसाहेब जान मदारी (रा. कोरेगाव पार्क, पुणे) असे बेड्या ठोकण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूडमध्ये राहणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोथरुडच्या काकू आणि त्यांची एक मैत्रीण गेल्या वर्षापासून भोंदूबाबा मदारी याच्याकडे जात होती. तिच्याकडूनच महिलेला या बाबाबद्दल माहिती मिळाली. तक्रारदार महिला विधवा असून तिला दोन मुले आहेत. घरची आर्थिक चणचण दूर व्हावी, असे तिला वाटत होते. ही बाब तिने बाबासमोर बोलून दाखविल्यानंतर मदारी याने तिला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा हंडा मिळवून देतो, असे सांगितल्यानंतर त्याने तिला पूजेचा घाट घालावा लागेल, असे सांगून तिच्याकडून दोन लाख 60 हजार रुपये घेतले.
पंधरा दिवसांपूर्वी त्याने आपल्या घरी पूजा मांडून तिला एक मातीचे मडके व त्यावर काळ्या रंगाचे कापड बांधून दिले. तसेच, ते कापड 17 दिवसांनी रात्री 11 वाजून 21 मिनिटांनी उघडण्यास सांगितले. मात्र 15 दिवसांनी या हांड्यात माती होती. फसवणूक महिलेला झाल्याचे जाणवताच पोलिसांनी सापळा लावून मदारीला ताब्यात घेतले, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. महंमद खानसाहेब जान मदारी, वय 65 वर्ष, रा. मदारी वस्ती, कोरेगाव पार्क, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार; तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, 2013 मधील कलम 3 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या मडक्यात निघाली माती
आरोपीने महिलेला पूजेसाठी घरी बोलवून एक मातीचे मडके काळ्या कपड्याने झाकून दिले होते. त्याने ‘हे मडके 17 दिवसांनी रात्री 11 वाजून 21 मिनिटांनी उघडावे, त्यात सोने मिळेल,’ असे सांगितले होते. महिलेने ठरलेल्या दिवशी मडके उघडले मात्र त्यात सोनं नाही तर माती होती. त्यामुळे महिलेला आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली. तिने पुन्हा महंमद याच्याशी संपर्क साधला असता, त्याने तिला परत घरी बोलावले. मात्र, या वेळी महिलेने पोलिसांची मदत घेतली. आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे तपास पथक करीत आहे. पोलिसांनी नागरिकांना अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
