Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये डेटिंग ॲपवरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर प्रत्यक्ष जाऊन भेटणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर पहिल्यांदा भेट झाली, त्यावेळी कारमध्ये शरीर संबंध झाले. पण, त्याच वेळी मोठी फसवणूक झाली. या प्रकरणातील पिडीत तरूणाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर, आणखी एक आरोपी पसार झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील नांदेड सिटी परिसरात ही घटना घडली आहे. गे डेटिंगवर ॲप ‘ग्राइंडर’वर पीडित तरुण आणि आरोपीची ओळख झाली. दोघांमध्ये चॅटींग झालं, पीडित तरुणाला आरोपीने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. प्रत्यक्षात भेटल्यानंतर तरुणाला धमकी देत अश्लील व्हिडिओ शूट केला आणि त्याच्या बदल्यात त्याला धमक्या देण्यात आल्या, पिडीत तरूणाकडे 10 हजार रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

आरोपी पीडित तरुणाशी ‘ग्राइंडर’ ॲपवरून संपर्कात आला होता आणि त्यानंतर दोघांतं बोलणं झालं, आरोपीने पिडीत तरूणाला विश्वासात घेऊन भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पीडित तरुणाला कारमध्ये बसवून तो त्याला वेगळ्या ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याच्यावर दबाव आणून अश्लील व्हिडिओ शूट करण्यात आला. ही क्लिप त्याच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देत आरोपीने त्याच्याकडे खंडणीची मागणी केली.

पीडित तरुणाने आरोपीला पैसे देण्यासाठी नकार दिला, त्यानंतर आरोपीने त्याचा मोबाईल हिसकावून गुगल पे आणि फोन पेवरून पैसे ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रॉबीन उर्फ शुभम कांबळे याला अटक करण्यात आली आहे, तर याप्रकरणातील दुसरा आरोपी ओंकार मंडलिक सध्या फरार असून, त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.