मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
सलग पाचव्या दिवशी सोन्यात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय टेरिफ दबावाचा फटका कायम असल्याने आज पुन्हा सोन्यात सकाळपर्यंत किरकोळ वाढ झाली आहे. रशियावर 50 दिवसांचा मुदतीनंतर 100ज्ञब टेरिफची चेतावणी डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच दिली. याशिवाय ब्रालीलनंतर युरोपियन युनियन कॅनडा, मेक्सिको यांच्यावर मोठा टेरिफ कर लादल्याचा परिणाम आजही जाणवत आहे. पर्यायाने आजही सोने महागले.
‘ गुडरिटर्न्स ‘ संकेतस्थळावरील माहितीनुसार,24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात सकाळपर्यंत 1 रूपये इतक्या किरकोळ वाढ झाल्याने सोन्याचे दर 9989 रुपयांवर पोहोचले तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात 1 रूपये वाढ झाल्याने किंमत 9156 रूपयांवर पोहोचली. 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात 1 रूपये वाढल्याने किंमत 7492 रुपयांवर पोहोचली आहे.
माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत 10 रूपये वाढ झाल्याने दर पातळी 99890 रुपयांवर पोहोचली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत 10 रूपयांनी वाढ झाल्याने दर पातळी 91560 रूपयांवर पोहोचली. 18 कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत 10 रूपये वाढ झाल्याने दर पातळी 74920 रूपयांवर पोहोचली आहे.
भारतीय सराफा बाजारातील मुंबईसह प्रमुख शहरांत 24 कॅरेट सोन्याचे सरासरी दर 9989 रूपये प्रति ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 9156, 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 7492 रुपयांवर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात यांमध्ये सकाळपर्यंत 0.18ज्ञब वाढ झाली होती. युएस गोल्ड स्पॉट दरात 0.39ज्ञब वाढ झाल्याने प्रति डॉलर सोन्याचा दर 3356.12 औंसवर पोहोचला आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स मधील सोन्याच्या निर्देशांकात 0.14ज्ञब वाढ झाल्याने एमसीएक्स दर पातळी 97911 रूपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे सोन्याचा एक लाखाचा टप्पा पार करण्यासाठी आता काही क्षण अवधी उरला आहे.
आंतरराष्ट्रीय टेरिफ दबावामुळे, वाढत्या अनिश्चितेतील वाढत्या मागणीमुळे, यापूर्वी गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा बुकिंग पार्श्वभूमीवर सोने सातत्याने वाढत आहे. विशेषत: डॉलरमध्ये रुपयांच्या तुलनेत सातत्याने वाढ होत असल्याने सोन्याला सपोर्ट लेवल प्राप्त झाली होती जी आजही कायम आहे. मात्र सातत्याच्या दबावाने बाजारात सोन्यात चढउतार कायम राहील असा अंदाज आहे.
