उद्योगपती परवेज गैवान यांच्या ठेकेदाराला सूचना ; प्रभाग चार मध्ये केली कामाची पाहणी
इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहरात ड्रेनेज लाईन टाकण्याची काम युद्धपातळीवर सुरू आहे रविवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव, उद्योगपती परवेज गैवान यांनी प्रभाग क्रमांक चार मध्ये कृष्णा नगर भागात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. ठेकेदाराला काम अधिक दर्जेदार, नीटनेटके आणि वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच कामात कोणतीही ढिलाई न करता नियमित गतीने काम चालावे यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला सूचना केल्या.
या कामाच्या गुणवत्तेवर आणि प्रगतीवर सतत लक्ष ठेवले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या कामामुळे परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारेल व नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
नागरिकांच्या हितासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आणि पायाभूत सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे गैबान यांनी सांगितले.
