Spread the love

खोकीधारकांचा अतिक्रमणाचा विळखा, वाहतूक कोंडी वाढली

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (संतोष पाटील)

हातकणंगले- इचलकरंजी रोडवरील पंचगंगा साखर कारखान्या समोर रस्ता रुंदीकरण आणि सारण गटारीसाठी खुला अतिक्रमणमुक्त रस्ता पुन्हा अतिक्रमणानेने व्यापला आहे. त्यामुळे वाहतुकीची पुन्हा प्रचंड कोंडी होत आहे. विशेष म्हणजे कारखान्याच्या भिंतीलगत असलेले एसटी पिकअप शेडही अतिक्रमण धारकांनी गायब केले आहे. त्यामुळे एसटी थांबणार कोठे असा प्रश्न उपस्थित झाला असून प्रवाशांना भर पावसात एसटी वाट पाहण्याची वेळ आली आहे. या गंभीर प्रकाराकडेही एसटी व्य्ावस्थापनो साफ दुर्लक्ष केल्याने तिकीट काढून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हातकणंगलेपासून इचलकरंजी रस्तावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. त्यातच पावसळ्यातील पाण्याचा योग्य निचरा होता नसल्याने वारंवार रस्ता खराब होत होता. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले होते. याचा विचार करुन रस्त्याच्या दोन्ही बाजुला सारण गटारी बांधून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. स्ाध्या 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.

पंचगंगा कारखान्याजवळ रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे काही दिवस काम थांले होते. अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली होती. नोटीस हातात पडल्यानंतर खोकीधारकांनी स्वत:हून अतिक्रकणे काढून घेतली. गटारीचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीची कोंडी कमी झाली होती. मात्र महिन्याभरापासून एक एक करत पुन्हा सर्वच खोकीधारकांना गटारीवर स्लॅ टाकून पुन्हा खोकी थाटली आहेत.

हे करत असताना काही नविन खोकीधारकांनी एसटीचे पीकअप शेड काडून टाकून त्या ठिकाणी नव्याने खोकी थांटली आहेत. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कुचंबना होत आहे. पिक शेडची ओळख पुसल्याने एसटी थांबणार कोठे असा प्रश्न तयार झाला आहे. पळा… पळा… एसटी आली अशी त्रेधा एसटीने प्रवास करणाऱ्यांची होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे पावसात थांबायचं कुठं असा प्रश्न या प्रवाशांच्या समोर आहे. भर पावसात एसटी वाट पाहण्याची वेळ प्रवाशांच्यावर आली आहे.

अतिक्रमणाला खातपाणी घालतयं कोण?
अतिक्रमणमुक्त झालेला रस्ता पुन्हा अतिक्रमाणानेच व्यापला आहे. दिवसा ढवळ्या राजरोसपणे अतिक्रमणे सुरु आहेत. याल जबाबदार कोण, हातकणंगलेचा सार्वजनीक बांधक़ाम विभागाने डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे. का असा संतापजनक सवाल लोक उपस्थित करत आहेत.
गाळप हंगामात मोठी अडचण
गळीत हंगाम सुरु होण्यास अजून चार महिन्यांचा अवधी आहे. आत्ताच रात्रीच्या वेळी वाहतुकची प्रचंड कोंडी होताना दिसते. आत्ताच असे चित्र असेल तर गळीत हंगामात वाहतूक कोंडीची कल्पनाच न केलेली बरी. या मार्गावरुन पंचगंगा, जावाहर, दत्त, वारणा, शरद तसेच सिमाभागातील साखर कारखान्यांची उस वाहतूक होते. त्यामुळे या अतिक्रमणाचा आत्ताच बंदोबस्त करण्याची गरज आहे.