इचलकरंजी/ महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी महापालिकेच्या स्टेशनरोडवरील स्वागत कमानीजवळील रस्त्याचे डांबरीकरण सुरु केल्याने वाहनधारकांस प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. यासंदर्भात दै. महान कार्य मधून सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल सार्वजनीक बांधकाम विभागाने घेतली आणि ताताडीने काम सुरु केले.
वर्षभरापूर्वी हातकणंगले सार्वजनीक बांधकाम विभागाने पाण्याचा निचरा होण्यासाठी स्वागत कमानीच्या पुर्वीकडील कमानीपासून कारखानाच्या दिशेने रस्त्याचे काँक्रटीकरण केले होते. मात्र काम करताना पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होईल याचा विचार करुन काम झाले नव्हते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाहनधारकांना वाहने चालवववी लागत होती. कमानीखालून वाहने बाहेर काढताना कसरत करावी लागत होती. त्यातच रस्त्यावर खडड्े पडले होत. त्या खड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने वाहन चालकांना खड्यांचा अंदाज येत न्ाव्हता परिणामी दररोज किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले होते. तर दुचाकी स्वारांना तर जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत होता. दोन दिवसांपूर्वी महान कार्य वृत्तपत्र आणि सोशल मिडियामधून सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले आणि सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटानस्थळाची पहाणी केली. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तातडीने खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात आले.
