Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात पुन्हा एकदा विश्वासघात आणि लैंगिक शोषणाची गंभीर घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवून, ती गर्भवती झाल्यानंतर तिच्या नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोळी टाकून गर्भपात घडवून आणल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी आदर्श वाल्मिक मेश्राम या 28 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित तरुणी आणि आदर्श मेश्राम यांचे 2018 पासून संबंध होते. दोघे कॉलेजमध्ये एकमेकांना ओळखत होते. त्या काळात आदर्शने तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. परंतु जेव्हा पीडित तरुणी गर्भवती राहिली, तेव्हा आदर्शने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनुसार, 3 जुलै 2025 रोजी आदर्शचा वाढदिवस होता, यानिमित्त ती यवतमाळहून पुण्यात आली होती. त्यावेळी आदर्शने तिच्यासाठी रबडी आणली. मात्र त्यामध्ये गर्भपाताची गोळी मिसळली होती. ही गोष्ट पीडितेला माहीत नसल्यामुळे तिने ती रबडी खाल्ली आणि काही वेळातच तिचा गर्भपात झाला.

मोबाईलमधून उघड झालं सगळं रहस्य

पीडितेच्या मोबाईलमध्ये आदर्शचे इतर मुलींशी असलेले संवाद आणि संबंध स्पष्ट दिसले. यामुळे तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पीडित तरुणीने आदर्शच्या जुन्या प्रेयसीशी संपर्क साधल्यावर, तिच्याही बाबतीत अशीच फसवणूक झाल्याचे समोर आले.या घटनेनंतर पीडितेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कलम 376 (बलात्कार), कलम 313 (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा सध्या तपास सुरू आहे.  या प्रकारामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रेमसंबंधाच्या आडून फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

पीडितेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी आदर्श वाल्मिक मेश्राम याचे इतर मुलींशी देखील संबंध होते. आदर्शचा मोबाईल पाहिल्यानंतर पीडितेला कळले की, त्याचे इतर मुलींशी संबंध आहेत. आदर्शच्या जुन्या प्रेयसीला देखील ही तरूणी भेटली, तिने देखील आदर्शचे सर्व कांड तिला सांगितले. आदर्शने लग्नाचे आमिष दाखवून तिचेही लैंगिक शोषणही केले होते, अशी माहिती त्याच्या जुन्या प्रेयसीने दिली. त्यानंतर 3 जुलै रोजी आदर्शने रबडीमध्ये गर्भपाताच्या गोळ्या मिसळून पीडितेला खायला दिल्या, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. उपचारानंतर पीडितेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 376 (लैंगिक अत्याचार), 313 (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.