कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
सातवा अयोग्य मधील वेतनत्रुटी, कंत्राटी भरती, सेवाप्रवेश नियम, नर्सिंग भत्ते, पदनाम बदल अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने 15, 16 जुलै रोजी मुंबईत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यातील परिचारिकासाठी काम, करणाऱ्या इतर समविचारी संघटनांना सोबत घेऊन, १५ व १६ जुलै २५ रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन व निदर्शने, १७ जुलै १ दिवसाचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. याची दखल न घेतल्यास, १८ जुलै पासून राज्यव्यापी बेमुदत तीव्र कामबंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना कोल्हापूर शाखेच्या पदाधिकारी योगेश यादव, श्रीमती मनुजा रेणके, श्रीमती विमल कलकुटकी, श्रीमती पल्लवी रेनके, श्रीमती मानसी मुळे, दत्ता ऐवळे, जॉय येमल, विराट चव्हाण, विजय परमार, विजय आढाव, विनोद पवार, सॅमसन कुरणे, राकेश ढाले, श्रीमती निहारिका हुपरीकर, गिरीश घोरपडे, श्रीमती जाई चव्हाण, श्रीमती रेश्मा गायकवाड यांनी दिलेली आहे.
