कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सूर्यकांत पाटील व उपसभापती पदी राजाराम चव्हाण यांची निवड करण्यात आली. कोल्हापूर शहर उपनिबंधक प्रिया दळणर यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडी झाली.
या निवडीनंतर बोलताना चेअरमन सूर्यकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर बाजार समितीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. या परिस्थितीमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी शाहू सांस्कृतिक भवन ही इमारत बीओटी तत्वावर देऊन त्यातून उत्पन्न वाढविणार आणि वर्षाला 25 कोटी रुपया पर्यंत बाजार समिती उत्पादन उत्पन्न जाईल यासाठी आपला प्रयत्न राहील. तसेच ज्या मोकळ्या जागा आहेत, त्या जागेवर व्यापारी संकुल उभा करणे हा एक मानस आहे. रस्ते गटर्सची जी अपुरी काम आहेत, ती पूर्ण केली जातील आणि या बाजार समितीला राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आपलं नियोजन असेल असे त्यांनी सांगितले. यावेळी भारत पाटील, प्रकाश देसाई, नंदकुमार वळून, शेखर देसाई यांची भाषणे झाली.
सभेला संचालक सुयोग वाडकर, कुमार आहूजा, संदीप वारंडेकर, शंकर पाटील, दिलीप पवार, पांडुरंग काशीद, शारदा पाटील, सचिव तानाजी दळवी आदी उपस्थित होते.
