Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सरकारला अनेक सवाल उपस्थित करत सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. आशातच राज्यात नव्यानं निर्माण झालेल्या मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्‌‍यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची हाक दिली होती. आज सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांकडून या मोर्च्याला परवानगी नसल्याने पोलिसांकडून अनेक कार्यकर्ते आणि आंदोलकांना पोलिसांनी धरपकड करत अटक केली आहे.

दुसरीकडे या मोर्च्याचे पडसाद  विधीमंडळात देखील उमटल्याचे बघायला मिळाले. तसेच विधिमंडळामध्ये अद्याप विरोधी पक्षनेते पद दिले जात नसल्याने विरोधकांनी सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणा बाजी करण्यात आली. या दरम्यान,  विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात प्रवेश करताच उपसभापति गोऱ्हेंच्या एन्ट्रीला मर्सिडीज एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. तर गोगावलेंच्या  एन्ट्रीला ओम फट स्वाहाच्या घोषणा देण्यात आल्याचे बघायला मिळाले.

सभागृहाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं?

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी अनेक मुद्द्‌‍यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा सातत्याने प्रयत्न केलाय. अशातच  आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात प्रवेश करताच सभागृहाच्या पायऱ्यांवर बसलेल्या विरोधकांनी उपसभापति गोऱ्हेंच्या एन्ट्रीला मर्सिडीज एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. त्यानंतर काही पावले पुढे जाऊन  नीलम गोऱ्हे यांनी मागे वळून पाहिले आणि आदित्य ठाकरेंना नीलमताईंनी एकप्रकारे रागीट लूक देत प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री भरत गोगावले सध्या अघोरी पूजेच्या व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पालघरचे पालकमंत्री होण्यासाठी आघोरी पूजा केल्याचा दावा ही अनेकांनी केला होता. आज त्याच मुद्द्‌‍यावर बोट ठवेत विरोधकांनी राज्यमंत्री गोगावलेंच्या एन्ट्रीला ओम फट स्वाहाच्या घोषणा देत डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला.