Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

शालेय अभ्यासक्रमांमध्ये जेव्हाजेव्हा ग्रहतारे, अवकाश यांच्याविषयीचे संदर्भ सांगितले जातात तेव्हा पृथ्वी हा सजीवसृष्टीचा वावर असणारा आणि प्रामुख्यानं पाणी (पिण्यायोग्य) असणारा एकमेव ग्रह असल्याचे संदर्भ सांगितले  जातात. मात्र आता हा संदर्भ भूतकाळात जाऊ शकतो. कारण, ठरत आहे ते म्हणजे नासाचं नवं संशोधन.

पृथ्वीशिवाय इतरही कोणत्या ग्रहावर पाणी, जलस्त्रोतांचं अस्तित्वं असू शकतं हे कैक वर्षांपासून सुरू असणारं शास्त्रज्ञांचं संशोधन आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. खगोलशास्त्रज्ञ आणि संशोधकांना एका अशा ग्रहाची माहिती मिळाली आहे, जो पूर्णपणे पाण्याचाच असल्याचं म्हटलं जात आहे.

पृथ्वीसारख्या या ग्रहाचं नाव काय?

हा अद्वितीय आणि तितकाच महत्त्वाचा शोध मोरक्कोच्या ऑकाइमेडेन लॅबच्या अब्दुरहमान साबकिउ यांच्या नेतृत्त्वाखाली शोधला गेला असून, या टीमनं ऱ्अएअ च्या ट्रान्सिटींग एक्सोप्लॅनेट सर्वे सॅटचेलाईटच्याच मदतीनं हा ग्रह शोधत त्याला ऊध्घ्-1846 ं असं नाव दिलं.

सदर ग्रहाच्या संशोधनाविषयी सविस्तर माहिती देत या ग्रहाचं वय साधारण 7.2 अब्ज वर्षे इतकं असून, त्याच्यावर पाण्याचे अतिप्रचंड साठे असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऊध्घ्-1846 ं हा ग्रह पृथ्वीच्या तुलनेत आकारानं दुप्पट आणि वजनानं चारपट असून, तो पृथ्वीपासून साधारण 154 प्रकाशवर्षे दूर असल्याचं म्हटलं जात आहे. संशोधकांच्या निरीक्षणानुसार एक्सोप्लॅनेटची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत 1.792 पटींमध्ये असून तो पृथ्वीहून 4.4 पट वजनी असल्याचं सांगण्यात येतं.

इथं एक वर्ष म्हणजे चार दिवस…

अहवालात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार ऊध्घ्-1846 ं दर 3.93 दिवसांमध्ये आपल्या उपग्रहाभोवतीची परिक्रमा पूर्ण करतो. म्हणजेच इथं पृथ्वीचं एक वर्ष म्हणजे तेथील अवघे तीन ते चार दिवस. या ग्रहाचं तापमान 568.1 खब (295ष्टण्) असल्याचा अंदाज असून, शास्त्रज्ञांनी त्याची अधिक माहिती मिळवण्यासाठी ऊएएए  शिवाय ग्राऊंड बेस्ड कलर फोटोग्राफी, हाय रेझोल्यूशन इमेजिंग, स्पेक्ट्रोस्कोपिक अशा तंत्रांचाही वापर केला. नव्यानं जगासमोर आलेल्या या ग्रहावर पाण्याचे प्रचंड साठे असून, त्यासंदर्भातील आणखी संशोधन सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता या ग्रहाबाबतची आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं कुतूहलपूर्ण ठरणार आहे.