Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

सलग तीन दिवस सोनं स्वस्त झाल्यानंतर आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी यामुळं सोन्याच्या दरात घसरण होत होती. मात्र आज सोनं पुन्हा एकदा वधारलं आहे. जागतिक घडामोडींमुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.

पुरवठ्याच्या संकटामुळं कच्च तेल साधारण 3 टक्क्‌‍यांनी वाढून 70 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. सोनं 3340 डॉलरवर स्थिरावला आहे. तर चांदीवर मात्र थोडा दबाव आहे. चांदी सलग 14 वर्षांच्या उच्चांकांवर आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने टॅरिफ दरांची धमक्यांनंतर त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होताना दिसत आहे.

आज 8 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 98,840 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 90,600 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 410 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 74,130 रुपयांवर पोहोचलं आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 90,600 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 98,840 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 74,130 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,060 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 9,884 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 7,413 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 72,480 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 79,072 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 59,304 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 90,600 रुपये

24 कॅरेट- 98,840 रुपये

18 कॅरेट- 74,130 रुपये