Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

येथील श्री आदिनाथ को-ऑप बँकेच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे चेअरमन सुभाष काडाप्पा यांनी सभासदांना ८ टक्के लाभांश देण्याचे जाहिर केले. सभेस सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चेअरमन काडाप्पा यांनी बँकेने अहवाल सालात १ कोटी ७९ लाख ढोबळ नफा तर तरतुदी वगळून ७७ लाख ७० हजार निव्वळ नफा मिळवला आहे. कर्जदार सभासदांना आपली कर्ज खाती रेग्यूलर ठेवावे. बँकेने आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यामतून १३५ सभासदांना १८ कोटी रुपये कर्ज वितरण करून अर्थसहाय्य उपलब्ध केले आहे. इतर ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. अनियमित कर्जदारावर नाईलाजास्तव कायदेशीर कारवाई करावी लागते याबाबत खेद व्यक्त केला. आम्ही ग्राहकांना मोबाईल बँकींगच्या माध्यमातून आयएमपीएस सुविधा व एटीएम क्यु आर कोड, युपीए सुविधेचा लाभ देत असल्याचे सांगितले. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आज छोट्या बँकांना सायबर सेक्यरीटी तंत्रज्ञान आणि त्यावरील होणारा खर्च हे मोठे आव्हान आहे. तसेच यासाठी व्यवसाय वाढवणे, नफा वाढवणे, कार्यक्षम बँकींग करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आद्यतिर्थकर आदिनाथ भगवान, संस्थापक स्व. आप्पासो मगदूम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संचालक श्रेणिक मगदूम यांनी स्वागत तर संचालक मधुकर मणेरे यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. मुख्यकार्यकारी अधिकारी जयकुमार उपाध्ये यांनी नोटीस वाचन केल्यावर सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजूरी दिली.सभेस व्हा. चेअरमन चंद्रकांत मगदूम, सभेस संचालक बाळासाहेब चौगुले, कुंतिलाल पाटणी, अभयकुमार मगदूम, सुदर्शन खोत, अनिल बम्मण्णावर, संपत कांबळे गुरूनाथ हेरवाडे, सुचित हेरवाडे, संचालिका मंगल देवमोरे, अनिता चौगुले, बीओएम सदस्य उमेश कोळी, अ‍ॅड. पवनकुमार उपाध्ये, माजी चेअरमन बाळासो चौगुले, डॉ. पारीसा बडबडे, शंकर हजारे, चवगोंडा लडगे, सतिश मगदूम यांच्यासह सभासद उपस्थित होते.