Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

बॉलिवूड अभिनेता अहान शेट्टी त्याच्या आगामी ‘बॉर्डर 2’ चित्रपटासाठी उत्साहित आहे. सनी देओल स्टारर चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये, अभिनेत्यानं त्याचे वडील सुनील शेट्टीची जागा घेतली आहे. आता अहाननं ‘बॉर्डर 2’ चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्यानं आपल्या पोस्टमध्ये ‘बॉर्डर’मधील वडील सुनील शेट्टीच्या लूकच्या कोलाजसह आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अहान हा ‘बॉर्डर 2’मधील लूकमध्ये दिसत आहे. आपल्या पोस्टमध्ये अहाननं आर्मी युनिफॉर्म घातला आहे, याशिवाय तो एका भिंतीच्या मागे उभा असल्याचा दिसत आहे. तसेच या फोटोच्या पोस्टमध्ये अहान शेट्टीनं लिहिलं, ‘प्रत्येक मुलगा त्याच्या वडिलांसारखा बनू इच्छितो.’

अहान शेट्टीचा फोटो व्हायरल : अहान शेट्टीनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, या पोस्टवर त्यानं लिहिलं ‘बॉर्डर 2.’ याशिवाय आणखी एका फोटोत अहानचा हात दिसत आहे, ज्यावर चिखल लागले असल्याचं दिसत आहे. वरुणनं हा फोटो अभिनेत्याला टॅग केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर त्यानं आपल्या वडिलांबरोबर शेअर केलेला फोटो हा अनेकांना आवडत आहे. तसेच यापूर्वी पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझनं ‘बॉर्डर 2’च्या सेटवरून स्वत:चा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तो खूप सुंदर दिसत होता. ‘सरदार जी 3’ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर असल्यानं तो वादात अडकलेला आहे. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, त्याला ‘बॉर्डर 2’मधून काढून टाकण्यात आलं आहे. अहान शेट्टीच्या पहिल्या चित्रपटाबद्दल : मात्र दिलजीतनं त्याच्या ‘बॉर्डर 2’च्या सेटवरून एक फोटो व्हिडिओ शेअर करून या बातम्याला पूर्णविराम दिला होता. दरम्यान अहान शेट्टीच्या पहिल्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं ‘तडप’ला प्रेक्षकांनी फार काही पसंत केलं नाही. अभिनेत्याचा हा चित्रपट 2021 रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये ॲक्शन आणि रोमान्स दाखविण्यात आला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर तारा सुतारिया दिली होती. हा चित्रपट 2018च्या तेलुगु चित्रपट ‘आरएक्स 100’चा हिंदी रिमेक आहे.