बीड / महान कार्य वृत्तसेवा
बीडच्या केज तालुक्यामध्ये एका गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली समोर आली आहे. 2 जून रोजी सदर तरुणी आपल्या नातेवाईक महिलेसोबत आरोग्य उपकेंद्रात जात असताना एकेठिकाणी थांबली होती. यावेळी नानासाहेब चौरे या नराधमाने या गतिमंद तरुणीवर अत्याचार केला. हा प्रकार सोबत असलेल्या महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर त्या महिलेला देखील कोणाला काही सांगू नको असे म्हणत धमकावले. आरोपी नानासाहेब चौरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर आता केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता अधिकचा तपास केज पोलीस करत आहेत.
बीडच्या केज तालुक्यामध्ये एका गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी नानासाहेब चौरे याला केज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन जून रोजी सदर तरुणी आपल्या नातेवाईक महिलेसोबत आरोग्य उपकेंद्रात जात असताना काही काळ एका ठिकाणी थांबली होती. यावेळी तिला तेथेच थांबवून ती महिला उपकेंद्रात गेल्यानंतर नानासाहेब चौरे यांनी या गतिमंद तरुणीवर अत्याचार केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान याच नानासाहेब चौरे यांनी काही महिन्यापूर्वी वाल्मीक कराड याच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत याकरिता गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. त्यानेच हा गुन्हा केल्याने आता याची चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान याच नानासाहेब चौरे यांनी काही महिन्यापूर्वी वाल्मीक कराड याच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत याकरिता गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. या गुन्ह्यानंतर आता वाल्मीक कराडच्या चेल्याने असं कृत्य केलं असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. त्याचबरोबर या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय? बुधवारी वाल्मीक कराडच्या चेल्याने गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी एका रुग्णालयासमोर उभी होती. एकट्या तरुणीला पाहून वाल्मीक कराडच्या या चेल्याने पीडित मुलीला आडबाजुला घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार सोबत असलेल्या महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर त्या महिलेला देखील कोणाला काही सांगू नको असे म्हणत धमकावले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. केज पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
