मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनीचे वडील जोसेफ यांचं निधन झालं आहे. आता निधनाची माहिती अभिनेत्रीनं स्वत:च्या सोशल मीडिया प्लॅटफफॉर्मवर शेअर केली आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर दिवंगत वडिलांचा फोटो पोस्ट करताना तिनं लिहिलं, ”आज माझे मन तुटले आहे… मी आज सकाळी माझे प्रिय वडील गमावले. या निरोपाच्या वेदना शब्दात वर्णन करता येत नाहीत. बाबा, तुमच्या अमर्याद प्रेम, ज्ञान आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद. तुम्ही नेहमीच माझ्या हृदयात राहाल.’ दरम्यान मंदाकिनीचे लग्न बौद्ध भिक्षू डॉ. काग्युर टी. रिनपोचे ठाकुर यांच्याशी झाले आहे, जे तिबेटी हर्बल सेंटर चालवतात. या जोडप्याला दोन मुले आहेत, रबिल नावाचा मुलगा आणि रब्झे इन्ना नावाची मुलगी. दरम्यान दलाई लामाची अनुयायी झाल्यानंतर, मंदाकिनी आता तिबेटीमध्ये योग वर्ग चालवते.
मंदाकिनीचे चित्रपट : 1990च्या दशकाच्या सुरुवातीला, अभिनेत्री गँगस्टर दाऊद इब्राहिमबरोबर तिच्या कथित संबंधांमुळं चर्चेत होती. मात्र तिनं नेहमीच दाऊदबरोबर प्रेमसंबंध असल्याचे नाकारले. मात्र कुख्यात गँगस्टर दाऊदबरोबरच्या नात्यामुळं तिच्या चित्रपट कारकिर्दीवर आणि सार्वजनिक प्रतिमेवर परिणाम झाला होता. मंदाकिनीला बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक राज कपूर यांच्या 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील भूमिकेमुळं प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात राजीव कपूर यांच्याबरोबर तिनं स्क्रीन शेअर केली होती. मंदाकिनी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री होती. तिनं अनेक लोकप्रिय चित्रपटामध्ये काम केलं आहे. यामध्ये ‘डान्स डान्स’, ‘कहां है कानून’, ‘प्यार करके देखो’, ‘बाज’, ‘शेषनाग’, ‘लोहान’, आणि ‘तकदीर का तमाशा’ या चित्रपटांचा समावेश आहेत.
मंदाकिनी झाली चित्रपटसृष्टीपासून दूर : मंदाकिनी शेवटी 1996 मध्ये अजय कश्यप दिग्दर्शित ‘जोरदार’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर गोविंदा, आदित्य पंचोली आणि नीलम यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. आता मंदाकिनी चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रिय असते. आजही तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मंदाकिनीला आपल्या चित्रपट कारकीर्दित खूप लोकप्रियता मिळाली होती.
