Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाला पोषक वातावरण आहे. तळ कोकणासह किनारपट्टी भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने पाच दिवस किनारपट्टी भागात तुफान पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असून त्यानंतर हळूहळू कमी होणार आहे.

राज्यातील बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली असून राज्यातील अनेक मोठे प्रकल्प, तलाव, नदी इत्यादि जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर पुढे आलेल्या माहितीनुसार, राज्यात सरासरी 93 टक्के पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे.

मराठवाड्यात कुठे काय शक्यता?

प्रादेशिक हवामान केंद्रानुसार पुढील तीन ते चार तासात नांदेड जिल्ह्यात तुरळ ठिकाणी तर छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव हिंगोली व परभणी जिल्ह्यात हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाचा अंदाज कुठे?

सिंधुदुर्ग ,रत्नागिरी, रायगड तसेच नाशिक, पुणे सातारा घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पालघर ,ठाणे ,मुंबई व कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा यलो अलर्ट आहे.

उत्तर महाराष्ट्र व विदर्भातही आज येलो अलर्ट देण्यात आलाय. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा ,वाशिम, अकोला ,अमरावती, यवतमाळ ,वर्धा, चंद्रपूर, नागपूर ,भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.

अरबी समुद्रात चक्राकार वारे, मुंबई ठाण्यासह किनारपट्टीवर तीव अलर्ट, विदर्भात वादळी पावसाची शक्यता, घ्श् चा अंदाज काय?

पुढील दोन दिवस पावसाचे: घ्श्

30 जून रोजी राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तळ कोकणासह मराठवाडा मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसाचे हायलर्ट देण्यात आले आहेत. मराठवाडा उत्तर महाराष्ट्र व विदर्भात 1 जुलै रोजी तळ कोकणासह उत्तर महाराष्ट्र बहुतांश मध्य महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील जिल्ह्यांना व संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आलाय.

पूर्व विदर्भ आणि मराठवाडा वगळता सरासरी एवढा पाऊस

-जूनमध्ये राज्यात सरासरीच्या 93 टक्के पाऊस

-जूनची सरासरी 208 मिमी, यंदा आतापर्यंत 194 मिमी पाऊस

– 155 तालुक्यांमध्ये सरासरीच्या शंभर टक्के पाऊस

– 87 तालुक्यांत सरासरीच्या 75 ते 100 टक्के पाऊस

-38 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 ते 50 टक्के पावसाची नोंद -पूर्व विदर्भ आणि मराठवाडा वगळता सरासरी एवढा पाऊस