अमरावती / महान कार्य वृत्तसेवा
अमरावतीत एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. 5 जणांच्या टोळक्यांनी त्यांच्यावर भर रस्त्यात हल्ला केला. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमरावती पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येच्या घटनेने हादरल आहे. वलगाव पोलीस स्टेशनचे अएघ् अब्दुल कलाम यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ड्युटीवरून घरी जात असताना 5 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. हल्लेखोरांनी आधी कलाम यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक देत जखमी केले व छातीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
अमरावती मध्ये एका एएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण अमरावती शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याचा हत्या झाल्याने पोलिसांसह सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. पोलिस अधिकारी अब्दुल कलाम हे वलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पोलिस ठाण्यात कालची सेवा संपवून घरी जात असताना चार ते पाच जणांनी कलाम यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक देत जखमी केले व छातीवर धारदार शस्त्राने वार करून चार ते पाच हल्लेखोर पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कलाम हे अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वलगाव पोलीस स्टेशनला कार्यरत होते. हल्ल्यानंतर कलाम यांना नजीकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळावर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया दाखल झाले असून हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांचे दोन पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. मात्र पोलिसांवरील हल्ल्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
