Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

जवळपास वर्षभरापासून टीम इंडियात संधी न मिळालेला स्टार फलंदाज ईशान किशन सध्या काउंटी चॅम्पियनशीपमध्ये नॉटिंघमशर संघात खेळतोय. ईशाने नॉटिंघमशरसह 2 सामन्यांचा करार केला. त्यानंतर ईशानने यॉर्कशायर विरुद्ध 22 जून पदार्पण करून काउंटी चॅम्पियनशीप डेब्यूत प्रतिभा दाखवून देत पहिल्या डावात 98 चेंडूत 87 धावांची खेळी केली. ईशानची इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ईशान किशन काऊंटी  चॅम्पियनशीपसाठी लंडनमध्ये असून त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ईशान किशन हा भोजपुरी गाण्यावर थिरकताना दिसतोय.

क्रिकेटर ईशान किशनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केलाय. या व्हिडीओमध्ये तो आपल्या एका साथीदारासोबत ऑटो रिक्षा सारख्या छोट्या गाडीत लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसतोय. दरम्यान या गाडीमध्ये भोजपुरी गायक नीलकमल सिंहच्या अल्बममधील एक प्रसिद्ध गाणं वाजत असून ‘जइसन खिलल बाड़ु, तू भंवरा से मिलल बाडुष्ठ’ असे आहेत, गाडी चालवत असताना ईशान किशन आणि त्याचा मित्र दोघे हे गाणं गुणगुणत असून गाण्यावर डान्स सुद्धा करताना दिसतायत.

भारतीय संघात संधीच्या प्रतीक्षेत ईशान :

ईशान किशन हा मागील महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. ईशान किशनने टीम इंडियासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा 2023 साली खेळला होता. ईशानची इंडिया ए टीममध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र ईशानला इंग्लंड लायन्स विरूद्धच्या 2 अनऑफिशियल टेस्टसाठी भारत ए संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. त्यानंतर ईशाने इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. ईशाने नॉटिंघमशरसह 2 सामन्यांचा करार केला आहे. ईशानला दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक काइल व्हेरेनच्या जागी त्याला नॉटिंघमशर संघात समाविष्ट करण्यात आले आहे, काइल व्हेरेन हा झिम्बाब्वेविरुद्ध दोन टेस्ट सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत गेला आहे.

 ईशान किशनचं क्रिकेट करिअर : ईशान किशनने भारतासाठी आतापर्यंत 2 टेस्ट, 27 वनडे, 32 टी 20 सामने खेळले आहेत. टेस्ट सामन्यात ईशान किशनने 78 धावा, वनडेत 933 धावा आणि टी 20 मध्ये 796 धावा केल्या आहेत. वनडेत ईशानच्या नावावर एक शतक आहे. ईशान किशनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 119 सामने खेळले असून यात त्यानं 119 धावा केल्या आहेत. ईशान किशन हा मूळचा पटना, बिहारचा राहणारा आहे.