Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पहिले भारतीय म्हणून इतिहास रचला आहे. ॲक्सिऑम 4 मिशनच्या क्रूनं अंतराळातून पृथ्वीचं सुंदर दृश्य आणि युरोपवरून उड्डाण करतानाचा अनुभव शेअर केला. ड्रॅगन अंतराळयानातून शुभांशु शुक्ला यांनी ”अंतराळातून नमस्कार” असा संदेश पाठवला. ”अंतराळात तरंगताना शांतता आणि थरार अनुभवला,” असं त्यांनी सांगितलं. या यशाला सामूहिक यश मानत त्यांनी कुटुंब, मित्र आणि सर्वांचे आभार मानले. राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु शुक्ला हे अंतराळात पोहोचलेले दुसरे भारतीय आहेत. गुरुवारी सकाळी 7 वाजता (एऊऊ) ड्रॅगन यान घ्एए च्या हार्मनी मॉड्यूलच्या स्पेस-फेसिंग पोर्टवर डॉक होणार आहे.

अंतराळ मोहिमेचा हा ऐतिहासिक क्षण : भारतीय वायुसेना पायलट आणि आता अंतराळवीर असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला (वय 39) यांनी आज अंतराळातून त्यांचा पहिला वैयक्तिक संदेश पाठवला. 41 वर्षांच्या खंडानंतर भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेचा हा ऐतिहासिक क्षण आहे. शुक्ला हे ॲक्सिऑम 4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (घ्एए) पोहोचले आहेत.

”सर्वांना नमस्कार, अंतराळातून नमस्कार. माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत येथे असल्याचा आनंद आहे. काय अप्रतिम प्रवास होता! लॉंचपॅडवर कॅप्सूलमध्ये बसलो असताना माझ्या मनात फक्त एकच विचार होता. ”जेव्हा प्रवास सुरू झाला, तेव्हा सीटवर दबाव जाणवला. हा एक अविस्मरणीय अनुभव होता. आणि अचानक सर्व शांत. तुम्ही निर्वात अवकाशात तरंगत असता,” असं त्यांनी सांगितलं.

स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटवर स्वार होऊन फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून लॉंच झालेल्या क्रू ड्रॅगन अंतराळयानात शुक्ला बसले होते. त्यांनी अंतराळातील अनुभव सांगताना म्हटलं, ”मी लहान बाळासारखा शिकत आहे; अंतराळात कसं चालायचं, कसं जेवायचं.”

मायक्रोग्रॅव्हिटीच्या अनुभवाबद्दल ते म्हणाले, ”जेव्हा आम्ही निर्वात अवकाशात पोहोचलो, तेव्हा मला फार बरं वाटलं नाही. पण मला सांगितलं आहे की मी कालपासून खूप झोपलो आहे.” शुक्ला हे ॲक्स-4 मोहिमेतील चार अंतराळवीरांपैकी एक आहेत. त्यांच्यासोबत कमांडर पेगी व्हिटसन, माजी नासा अंतराळवीर आणि तीन मोहिमांचा अनुभव असलेली व्यक्ती, तसंच हंगेरीचे टिबोर कपु आणि पोलंडचे स्लावोझ उझनान्स्की-विस्निव्हस्की आहेत.

या प्रक्षेपणाचे थेट प्रक्षेपण शुक्ला यांच्या कुटुंबीयांनी आणि भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेतील हजारो शुभचिंतकांनी पाहिलंय. लखनऊपासून बुडापेस्ट, ग्दान्स्कपासून ह्युस्टनपर्यंत, फाल्कन 9 रॉकेटनं ऐतिहासिक थ्ण्-39अ लॉंचपॅडवरून उड्डाण केलं तेव्हा जल्लोष झाला. हाच तो लॉंचचपॅड जिथून जुलै 1969 मध्ये अपोलो 11 चंद्रावर गेलं होतं.

या मोहिमेसह शुक्ला हे अंतराळात पोहोचणारे दुसरे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. यापूर्वी विंग कमांडर राकेश शर्मा यांनी एप्रिल 1984 मध्ये भारत-सोव्हिएत संयुक्त मोहिमेत अंतराळात प्रवास केला होता.

ही मोहीम मूळत: 29 मे रोजी नियोजित होती, परंतु हवामानातील अडथळे आणि फाल्कन-9 रॉकेट तसंच ड्रॅगन कॅप्सूलमधील तांत्रिक समस्यांमुळं अनेकदा पुढं ढकलली गेली. नासा, स्पेसएक्स आणि ॲक्सिऑमच्या टीमनं जवळपास एक महिना समस्यांचं निराकरण करून यशस्वी प्रक्षेपण केलं.