इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील आयजीएम इस्पितळास राज्य सरकारने गौरविवल्यांनंतर आयजीएममधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आमदार डॉ.राहूल आवाडे यांची भेट घेवून धन्यवाद दिले. यावेळी बक्षिस म्हणून त्यांनी आवश्यक सुविधांसाठी प्रत्येक वर्षी मिळाऱ्या आमदार फंडातील 50 लाख रुपये आयजीएमसाठी राखीव ठेवले जातील, अशी घोषणा केली.
ब्राजीलच्या साखर उद्योगाचा अभ्यास दौऱ्यावरुन परतल्यानंतर आयजीएममधील अधिकाऱ्यांनी डॉ.आवाडे यांची सदिच्छा भेट घेतली. पुष्पगुच्छ देवून त्यांना धन्यवाद दिले. यावेळी आ.आवाडे यांनी शिष्टमंडळासोबत व्यापक चर्चा केली. येथे आता काय अडचणी आहेत. नर्सिंग कॉलेजची प्रक्रिया सुरु झाली आहे का. सर्व विभागात शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे का, मुबलक पाणी मिळते का. आदी विषयांची डॉक्टरांकडून महिती घेतली यावेळी शल्य चिकित्सकांनी काही अडचणी मांडल्या.
यावर डॉ.आवाडे यांनी तातडीने वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधत पूर्तता करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर सर्व डॉक्टर वेळेवर उपस्थित असतात का सीसीटीव्ही कॅमेर राँडम पद्धतीने कोणत्याही क्षणी तपासणार, आपलं शहर कामगार लोक वस्तीचे आहे. परिसरातील ग्रामीण भागातील लोकही उपचारासाठी येतात त्यांना कशाचीही तोशीस लागणार नाही. याची दक्षता घ्या. तक्रार अजिबात चालणार नाही. हे इस्पितळ सर्वसमान्यांसाठी आहे. आलेल्या प्रत्येक रुग्णांशी आपुलकीने बोला. त्यांना आदर द्या. चाकोरीबद्ध काम करु नका. असा इशारा देत मी तुमच्या सोबत आहे. चिंता करु नका असा विश्वासही दिली. यावेळी समन्वयक कपील शेटके उपस्थित होते.
