मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री अजित पवार थेट मैदानात उतरल्यामुळे राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निकाल हाती येत आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू आहे. मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून आज दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत अजित पवार गटाला यश मिळताना दिसत असून आता तावरे पॅनलला मोठा धक्का बसला आहे . अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतन कुमार साहेबराव भोसले विजयी झाले आहेत . तावरे गटाचे बापूराव आप्पा गायकवाड पराभूत झाले आहेत . 1487 मतांनी रतन कुमार भोसलेंनी निळकंठेश्वर पॅनलच्या अनुसूचित जाती मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे .
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली . या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनल, भाजप नेते चंद्रग्रहण तावरे -रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनल असे चार पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात होते .
अजित पवारांचा आणखी एक उमेदवार विजयी !
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत अजित पवारांच्या नीळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतन कुमार साहेबराव भोसले हे 1487 मतांनी विजयी झाले आहेत . रतन कुमार भोसले यांना एकूण 8670 मते मिळाली .तर तावरे गटाचे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार बापूराव आप्पाजी गायकवाड यांना 7183 मते मिळाली .
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाने ब वर्गातून आधीच विजय मिळवला होता .आता अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातूनही त्यांच्या पॅनलचा उमेदवार विजयी झाल्याने त्यांची ताकद अधिक वाढली आहे . या निवडणुकीच्या पहिल्या निकालानुसार 102 पैकी 101 मत वैध ठरले असून अजित पवारांना 91 मते मिळाली आहेत .या गटासाठी सहकारी संस्था मतदान करतात .
नीळकंठेश्वर पॅनलचा तिसरा उमेदवार विजयी
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचा तिसरा उमेदवारही विजयी झाला आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) मतदारसंघातून नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार नितीन शेंदे यांनी 8494 मते मिळवत स्पष्ट आघाडी घेतली. त्यांनी तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलचे उमेदवार रामचंद्र नाळे यांचा 1153 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात रामचंद्र नाळे यांना एकूण 7341 मते मिळाली. नितीन शेंदे यांच्या या विजयामुळे नीलकंठेश्वर पॅनलने तिन्ही प्रमुख मतदारसंघांमध्ये आपली ताकद दाखवली आहे. यापूर्वी ‘ब वर्ग’ मतदारसंघातून अजित पवार गट विजयी झाला होता, तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून रतनकुमार भोसले यांनी बाजी मारली होती. आता नितीन शेंदे यांच्या विजयामुळे पॅनलचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे.
तावरे गटाला धक्का ! माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणी निकालानुसार अजित पवारांचे बहुतांश उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचा स्पष्ट होत आहे .हा तावरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे .सहकार बचाव शेतकरी पॅनल या नावाने लढत असलेल्या या गटाला याआधी काही जणांवर पराभवाचा सामना करावा लागला होता .याचे चित्र आहे .
