Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

शहापूर परिसरातील धनगरमाळ येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून आणि माजी बांधकाम समिती सभापती तथा शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या श्री संत बाळूमामा मंदिरातील सांस्कृतिक भवनचे उद्घा‌टन आमदार पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

धनगरमाळ परिसरात श्री संत बाळूमामा मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमासह परिसरातील नागरिकांना उपयुक्त असे सांस्कृतिक भवन बांधकामासाठी भाऊसाहेब आवळे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने आमदार पडळकर यांनी सभागृह बांधकामासाठी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. 

याप्रसंगी माजी उपनगराध्यक्षा सौ. सरिता आवळे, माजी नगरसेविका सौ.सोनाली अनुसे, किसन शिंदे, दादासो भाटले, राजू खोत, जहांगीर पटेकरी, रणजित अणुसे, संदीप थोरात, बापू म्हैशाळे, श्री. झुंजकर, विष्णू बत्ते, सतीश कारदगे, दीपक म्हैशाळे, अमोल म्हैसाळे, राजू म्हैसाळे, सुनील म्हैशाळे, संजू म्हैशाळे, काशिनाथ म्हैशाळे, विद्यासागर बन्ने, बाळू रायबाकर, युवराज पाटील, सुभाष लास्कर, वाघमारे पाटील, परसू कॉडीकर, साजन बेंद्रे, विनायक सुर्यवंशी, अब्राहम भोसले, प्रमोद कोष्टी, विनायक विरदे, मधुकर देशींगे आदींसह शहापूर परिसरातील सर्व धनगर समाज उपस्थित होते.