रूपाली चाकणकरांच्या नातेवाईकाचा गंभीर आरोप, शरद पवार यांच्या पक्षाच्या पुणे शहराध्यक्षाच्या पतीवर गुन्हा दाखल
पुणे / महान कार्य वृत्तसेवा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे यांचे पती सचिन पोकळे यांच्यावर सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे नातेवाईक विक्रम चाकणकर यांच्याकडून व्याजाचे जास्त पैसे उकळल्याची तक्रार पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. ही तक्रार दाखल केल्यानंतर स्वाती पोकळे यांच्या पतीवर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला.
स्वाती पोकळे यांच्या पतीने व्याजाच्या रूपात चार ते पाच कोटी घेतल्याचा आरोप रूपाली चाकणकर यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आलाय. व्याज वसुली करताना शिवीगाळ, दमदाटी, त्रास देणे आणि घरातलं स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्याची धमकी देखील त्यांनी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. स्वाती पोकळे यांच्या पतीकडे सावकारी करताना कोणताही शासकीय परवाना घेतला नव्हता, असंही तक्रारीत म्हटलं आहे.
आमच्याकडून व्याज म्हणून 4 ते 5 कोटी उकळले, अनब आता…. बंडू गाडे यांना 21 लाख रुपये, साक्षीदार सुभाष कोल्हे यांना 2.61 कोटी रुपये आणि रूपाली चाकणकर यांच्या नातेवाईकाला 60 लाख रुपये दहा ते वीस टक्के व्याजाने दिले होते आणि त्यानंतर व्याजाच्या रूपात चार ते पाच कोटी आमच्याकडून घेतल्याचाही आरोप चाकणकर यांचे नातेवाईक विक्रम चाकणकर यांनी केला आहे.
