Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा मोठा उलटफफेर झाला आहे. मौल्यवान धातुच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. इस्राइल आणि ईराण या दोन्ही देशांत गेल्या 10 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या दरम्यान र्श्ण्‌ेंवर सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीदेखील 557 रुपयांनी घसरून 106206 रुपयांवर पोहोचले आहे. आहे आहेत आजचे सोन्याचे दर जाणून घेऊयात.

आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील सोन्याच्या दरात घसरण नोंदवली आहे. सोनं 30 डॉलरने घसरून 3360 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. तर चांदी एक टक्क्‌‍याने घसरून 36 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. या कारणामुळं गुंतवणुकदार आता जोखीम असलेल्या पर्यायंकडे वळत आहेत. सोनं-चांदीचे दर सोमवारी तेजीत होते. मात्र आज दरांमध्ये मोठे उलटफफेर झाले आहेत. आज भाव गडगडले आहेत. यामागे युद्धाचे परिणाम असल्याचे म्हटलं जातं आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रुपयांची घसरण झाली असून सोनं प्रतितोळा 99,870 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांनी घसरले असून प्रतितोळा 91,550 रुपयांवर स्थिरावलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याचे दर 610 रुपयांनी कमी झालं असून 74,910 रुपयांवर स्थिरावलं आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत

10 ग्रॅम     22 कॅरेट  91, 550 रुपये

10 ग्रॅम     24 कॅरेट  99,870 रुपये

10 ग्रॅम    18 कॅरेट  74, 910 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट  9,155 रुपये

1 ग्रॅम     24 कॅरेट  9, 987 रुपये

1 ग्रॅम    18 कॅरेट   7, 491  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

8 ग्रॅम     22 कॅरेट   79, 896 रुपये

8 ग्रॅम     24 कॅरेट   73, 240 रुपये

8 ग्रॅम    18 कॅरेट    59, 928  रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 91, 550 रुपये

24 कॅरेट-99,870 रुपये

18 कॅरेट- 74, 910 रुपये