Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

जागतिक घडामोडी आणि तणाव याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसत आहे. र्श्ण्‌ें वर आज सोन्याच्या दरात किंचितशी घसरण होताना दिसतेय. तर, चांदीच्या दरात मात्र तेजी आली आहे. चांदी आज 270 रुपयांनी वाढून 106494 रुपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर इतक्या घडामोडी घडत असतानादेखील सोनं आणि चांदीच्या दरांवर कोणतेही मोठे बदल झालेले नाहीये. सोनं जवळपास 3380 डॉलर आणि चांदी 36 डॉलरच्या स्तरावर स्थिर आहे.

मागील आठवड्यात सोनं खरेदीदारांसाठी मोठा दिलासादायक ठरला होता. काही दिवसांपूर्वी सोन्याने 1 लाखांचा टप्पा पार केला होता. मात्र त्यानंतर सोन्याचे दर उतरणीला लागले होते. आजदेखील सोनं एक लाखांवरच आहे मात्र आधीच्या तुलनेत दर काहीसे घसरले आहेत. येत्या काळात सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 60 रुपयांनी घसरले असून भाव 1,00,690 रुपयांवर पोहोचले आहेत.

दरम्यान, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 50 रुपयांची घट झाली असून भाव 92,300 रुपयांवर पोहोचले आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 40 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा भाव 75,520 रुपयांवर पोहोचले आहेत.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत

10 ग्रॅम     22 कॅरेट  92, 300 रुपये

10 ग्रॅम     24 कॅरेट  1,00 ,690 रुपये

10 ग्रॅम    18 कॅरेट  75,520 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट  10, 069 रुपये

1 ग्रॅम     24 कॅरेट  9, 230  रुपये

1 ग्रॅम    18 कॅरेट   7, 552  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

8 ग्रॅम     22 कॅरेट   80,552 रुपये

8 ग्रॅम     24 कॅरेट   73,840 रुपये

8 ग्रॅम    18 कॅरेट    60, 416 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 92, 300 रुपये

24 कॅरेट- 1,00 ,690 रुपये

18 कॅरेट- 75,520 रुपये