मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
‘जन नायगन’च्या निर्मात्यांनी थलापती विजयच्या 51 व्या वाढदिवशी चाहत्यांना एक उत्तम भेट दिली आहे. एच. विनोथ दिग्दर्शित हा चित्रपट विजयचा शेवटचा चित्रपट असणार आहे, कारण यानंतर तो त्यांच्या राजकीय पक्ष तमिलगा वेत्री कजगम (टीव्हीके) वर लक्ष केंद्रीत करणार आहे. थलापती विजयच्या ‘जन नायगन’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी बहुप्रतीक्षित ‘फर्स्ट रोअर’ शीर्षक दिल्यानंतर फर्स्ट लूक आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. केव्हीएन प्रॉडक्शन्सनं 21 आणि 22 जूनच्या मध्यरात्री त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर ‘जन नायगन – द फर्स्ट रोअर’बद्दल कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा थलापती विजय, उत्सव साजरा करत राहा.’
थलापती विजयचा फर्स्ट लूक : ‘जन नायगन – द फर्स्ट रोअर’मधील टीझरची सुरुवात ही विजयच्या आवाजानं होते, ज्यामध्ये तो म्हणतो, ”तुम्ही लोक माझ्या हृदयात जिवंत राहाल.” यानंतर, एक शक्तिशाली मजकूर येतो, ज्यामध्ये लिहिले आहे ‘एक खरा नेता सत्तेसाठी नाही तर लोकांसाठी आवाज उठवतो.’ त्यानंतर आणखी एक उत्तम दृश्य येते, ज्यामध्ये तो पोलिसांचा गणवेश घालून हातात तलवार घेऊन दंगलग्रस्त भागातून जातो. त्यानंतर तो रक्तानं माखलेल्या तलवारीच्या टोकानं मिशा सेट करताना दिसते. तसेच निर्मात्यांनी ‘जन नायगन – द फर्स्ट रोअर’चे एक नवीन पोस्टर देखील रिलीज केलं आहे, ज्यामध्ये विजय हातात तलवार घेऊन चामड्याच्या सिंहासनावर बसलेला दिसतो. हे पोस्टर शक्ती आणि नेतृत्व दर्शवते.
‘जन नायगन’ – द फर्स्ट रोअर’ची स्टार कास्ट : 15 मिनिटांत 10 लाखांहून अधिक रिअलटाइम व्ह्यूज ‘जन नायगन’मधील टीझरला मिळाली आहे. निर्मात्यांनी रिअल टाइममध्ये चित्रपटाबद्दल अपडेट दिली आहे. निर्मात्यांनी एक छोटी क्लिप शेअर करून माहिती दिली आहे की ‘जन नायगन’ला 15 मिनिटांत 10 लाखांहून अधिक रिअलटाइम व्ह्यूज मिळाले आहेत. ‘जन नायगन’ हा एक राजकीय ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन एच विनोथ यांनी केलंय. या चित्रपटाची निर्मिती ख्न्न्ऱब प्रॉडक्शन केली आहे. ‘जन नायगन’ चित्रपटात पूजा हेगडे आणि बॉबी देओल देखील मुख्य भूमिकेत आहेत, तर प्रकाश राज, नारायण, प्रियमणी, ममिता बैजू आणि मोनिशा ब्लेसी सारखे कलाकार यात दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिलंय. हा चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
