इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित ए.पी.मगदूम हायस्कूल माणगाव या शाळेत श्री यशवंत कानतोडे प्रभारी विभाग नियंत्रक संतोष बोगरे, विभागीय वाहतूक अधिकारी, सागर पाटील आगार व्यवस्थापक इचलकरंजी तसेच शाळेचे मुख्याध्यापक एस. वाय. काटे यांच्या हस्ते शाळेत विद्यार्थ्यांना पास वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षक वृंद व विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते. शासन निर्णयानुसार इचलकरंजी शहरातील शाळांमध्ये देखील विध्यार्थी बस पास वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
