इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
अमरावती येथे सुरू असणाऱ्या बच्चू कडू यांच्या अन्यत्याग उपोषणा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना इचलकरंजी, दिव्यांग संयुक्त कृती समिती इचलकरंजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रांत कार्यालयावर धडक दिली. यावेळी बच्चू कडूंनी केलेल्या मागण्या तातडीने मागण्या कराव्यात अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला. सदर मागणीचे निवेदन हाकणंगले तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार संदिप चव्हाण यांनी स्वीकारले.
अमरावती येथील मोझरी येथे गेले सहा दिवस बच्चुभाऊ कडू यांच्या अन्नत्याग उपोषण आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी इचलकरंजी प्रांत कार्यालयाला सुट्टी असुनही प्रहार दिव्यांग क्रांती संघटना इचलकरंजी, दिव्यांग संयुक्त कृती समिती इचलकरंजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कर्ज माफी व दिव्यांगाना सहा हजार पेन्शन मागणीसाठी अपंग बांधवांनी प्रांत कार्यालयावर जाहीर निषेध करत शनिवारी मोर्चा काढला. यावेळी शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर मागण्या मान्य करावे, अन्यथा चक्का जाम आंदोलन करुन सर्व दळणवळणाची सोय बंद करण्याचा इशाराही यावेळी दिला.
यावेळी निवासी नायब तहसीलदार संदिप चव्हाण हे कार्यालय येऊन निवेदन स्वीकारले.
निवेदन देते वेळी प्रहार उपजिल्हा अध्यक्ष उत्तरविभाग सुनिल पाटील शहराध्यक्ष अनिल विजयनगरे, महिला अध्यक्षा अंजना नेतले, दिव्या सुतार, तडाखे जमीर माणकापुरे, निलेश कुंभार, संभाजी शेलार, प्रहार जनशक्ती पक्षाचे जि संपर्कप्रमुख दादासो सुतार, सुनिल शिंदे मार्तंड कांबळे, कबनूरचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे, संजय मांगलेकर, संतोष यलगार, इरफान बागवान, ओमकार ढंगे, जिवन पोतदार, रशिदा गलगली, गीता बारीगदे, निता अतिग्रे, सलिमखान पठाण , राजेंद्र संकपाळ, ईश्वर फडतारे, भारती नेजे, दिलशाद मुजावर, पुजा गावडे, सागर शिगांरे, सागर वास्कर, संतोष करडे आणि मोठ्या संख्येनं दिव्याग बांधव सहभागी झाले होते.
शिवाजीनगर पोलिस ठाणाचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 30 जून पर्यंत सर्व मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन बच्चुभाऊ कडू यांना दिल्यामुळे सदरचे आंदोलन 30 जूनपर्यत स्थगित ठेवण्यात आल्याचे प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी सांगितले आहे.
